शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

महाव्यवस्थापकच गोंधळतात तेव्हा...

By admin | Published: May 06, 2014 9:18 PM

दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले.

वेल्डिंगच्या समस्येमुळे अपघात झाल्याच्या वक्तव्यात तीन वेळा बदल

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात

मुंबई - दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले. मंगळवारी ते या अपघाताची सविस्तर माहीती देताना पत्रकारांशी बोलत होते. अपघाताबद्दलचे कारण महाव्यवस्थापकाकडून सांगतानाच हा अपघात वेल्डिंगमुळे झाला नसल्याचे पुन्हा सांगत त्याबद्दल तीन वेळा आपले वक्तव्य बदलण्यात आले आणि पुर्ता गोंधळच पत्रकार परीषदेत उडवून दिला. या गोंधळानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतर ते स्पष्ट होईल, अशी माहीती त्यांच्याकडून त्वरीत देण्यात आली. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. यावर बोलताना सूद म्हणाले की, देखभाल आणि दुरुस्ती ही आमच्याकडून कमी होत असल्याचे जरी सांगितले जात असले तरी ते खरे नाही. रेल्वे रुळांची देखभाल ही किमॅनकडून केली जाते. असे अपघात हे किमॅनकडूनच रोखले जावू शकतात. आतापर्यंत त्यांच्याकडून अनेक चांगल्या कामगिरी पार पाडण्यात आल्या असून आपल्या कामात ते ९५ टक्के यशस्वी ठरतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. त्यांच्या २0 टक्के जागा जरी रिक्त असल्या तरी त्या आमच्याकडून भरण्यात येतात. मात्र कालांतराने त्या जागा पुन्हा रिक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पॅसेंजर ट्रेनचा झालेला अपघात हा वेल्डिंग बरोबर नसल्यानेच झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे सांगत त्यांनी मानवी चुकांमुळे झालेल्या अपघाताला पुष्टी दिली. मात्र हे सांगताच आम्ही सर्व बाजू तपासत असून हा अपघात वेल्डिंगमधील चुकांमुळेच झाला असेल ते सांगणे कठीण असून सध्या उन्हाळा वाढला असून तापमानातील वाढीमुळे रुळात बदल झाल्याचे सांगत हेदेखिल एक कारण असल्याचे सूद यांनी सांगितले. या दोन कारणांनंतर पुन्हा वेल्डिंग करण्यात चूक झाल्याची शक्यता वर्तवत ज्यांनी हे काम केले त्याचा सत्कार केला पाहिजे, असे आश्चर्यकारक विधान केले आणि एकच गोंधळ उडवून दिला. त्यानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकते, असे सांगत दोन महिन्यात हा अहवाल सादर होईल, अशी माहीती त्यांनी दिली. ......................................................मुख्यमंत्र्यांनाच विचारा...नागोठणे येथील अपघातस्थळी भेट दिल्यानंतर आणि जखमी रुग्णांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रेल्वेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले होते. पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये कामकाजाचा समन्वय नसून त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे ते म्हणाले होते. याबाबत महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांना विचारले असता, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे त्यांनी पत्रकारांनाच सांगितले. ...........................................एका वर्षात २६0 वेळा रेल्वे सेवा होते विस्कळीतमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एका वर्षात जवळपास २५0 ते २६0 रेल्वे सेवा विस्कळीतचे प्रमाण असल्याचे यावेळी सूद यांनी सांगितले. सेवा विस्कळीतचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.