शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

राज्यात व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांची अंतिम अधिसूचना केव्हा? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 6:07 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, ५४ अभयारण्यांची अंतिम अधिसूचना जारी करणे आवश्यक होते. मात्र, राज्याच्या वन्यजीव विभागाने अद्यापही ते जारी केले नाही. त्यामुळे वन्यजीव संरक्षण, संवर्धनाबाबत तयार होणारा व्यवस्थापन आराखडा बारगळला असून, २० वर्षांपासून ‘नोटीफिकेशन’ची प्रतीक्षा आहे.

राज्यात व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांची अंतिम अधिसूचना केव्हा?  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

गणेश वासनिकअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, ५४ अभयारण्यांची अंतिम अधिसूचना जारी करणे आवश्यक होते. मात्र, राज्याच्या वन्यजीव विभागाने अद्यापही ते जारी केले नाही. त्यामुळे वन्यजीव संरक्षण, संवर्धनाबाबत तयार होणारा व्यवस्थापन आराखडा बारगळला असून, २० वर्षांपासून ‘नोटीफिकेशन’ची प्रतीक्षा आहे.सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक ३३७/९५ सोसायटी फॉर एन्व्हारमेंटल लॉ विरुद्ध भारत सरकार व इतर प्रकरणी निकाल जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्यांचा अंतिम अधिसूचना दोन वर्षांच्या आत जारी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु, सन १९९७ पासून राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, ५४ अभयारण्याची वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २६ नुसार अंतिम अधिसूचना जारी केलेली नाही. ही अधिसूचना जारी व्हावी, यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय सशक्तता समितीदेखील गठित केली होती. या समितीने वारंवार पाठपुरावा करूनही राज्य शासनाने अंतिम अधिसूचना जारी केली नाही. शासन स्तरावर या अधिसूचना वर्षांनुवर्षे प्रलंबित राहत असल्याने व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांच्या हद्दीपासून ईको सेसेंटिव्ह झोन जाहीर करता आले नाही. त्यामुळे या नियमबाह्य बाबीची दखल सर्वोच्च न्यायालयाने १५ सप्टेंबर २०१७ रोजी घेतली. त्याअनुषंगाने राष्ट्रीय उद्याने, अभयारण्यांपासून ईको सेसेंटिव्ह झोन हे  १० किमी. पेक्षा कमी अंतरावर जाहीर झाले, असे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांना तातडीने स्थगिती दिली आहे. असे असताना मंत्रालयात संबंधित विषय हाताळणारे अधिकाºयांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंतिम अधिसूचनेचे प्रस्ताव दाबून ठेवल्याचे वास्तव असून, ही बाब सर्वोच्च न्यायालयाचे अवमान करणारी आहे.

अधिसूचना आवश्यक का?वन्यजीव, वनविभागात विविध विकास कामे, निधी खर्च करताना नियोजन करावे लागते. त्याकरिता व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. मात्र, अंतिम अधिसूचना लागू झाल्याशिवाय व्यवस्थापन आराखडा तयार करता येत नाही. परंतु वन्यजीव विभागाने २० वर्षांपासून अंतिम अधिसूचना जारी केली नसल्याने वन्यजीवांबाबतचे नियोजन कुचकामी ठरत आहे.

वन्यजीवांसाठी पाच ते २० वर्षांचे नियोजन-वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनासाठी पाच ते २० वर्षांसाठीचे नियोजन केले जाते. यात वन्यप्राण्यांची संख्या, त्यांचे आहार, वृक्षारोपण, तृणभक्षी, गवताचे प्रकार आदी बाबींचा समावेश आहे. एकदा नियोजन ठरले की ते वन विभाग ते मंत्रालयात पाठविते. त्यानंतर राज्य सरकारचे वन्यजीव सल्लागार बोर्ड ते केंद्र सरकारचे सल्लागार बोर्ड, देहरादून येथील वाईल्ड लाईफ इंन्स्टिट्युट ते केंद्रीय पर्यावरण मंत्रालय पुढे सर्वोच्च न्यायालय, पुन्हा केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालय त्यानंतर राज्य शासनाचे वनमंत्रालय असा नियोजन फाईलींचा प्रवास चालतो.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल