…जेव्हा गाळ काढण्यासाठी खुद्द मंत्रीच नाल्यात उतरतो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 04:07 PM2019-11-03T16:07:58+5:302019-11-03T16:16:00+5:30
अन्न पुरवठा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे त्यांनतर सोशल मिडिया आणि स्थानिक माध्यमांमध्ये ते चर्चेत आले आहे.
नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अनेक नेत्यांना हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवताना पहिले असेल. मात्र मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारमधील एका मंत्र्याने एक पाऊल पुढे टाकले आणि घाण असलेल्या नाल्यात उतरून ते स्वता: स्वच्छ केले. अन्न पुरवठा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे त्यांनतर सोशल मिडिया आणि स्थानिक माध्यमांमध्ये ते चर्चेत आले आहे.
ग्वालियर जिल्ह्यातील बिरला नगर परिसरात असलेल्या नाल्यात कचरा आणि गाळ मोठ्याप्रमाणावर वाढल्याने त्यातील पाणी वस्तीत शिरले असल्यानी लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे परिसरात लोकं आजारी पडत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे या सर्व बाबत स्थानिक नागरिकांनी प्रद्युम्न तोमर यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानंतर ग्वालियर विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले प्रद्युम्न तोमर यांनी स्वत: नाल्यात उतरून फावड्याने गाळ बाहेर काढायला सुरवात केली. एका मंत्र्याला कंबरेपर्यंत नाल्यात बुडलेली घाण काढताना पाहून तेथील इतर लोकही पुढे आले आणि त्यांनी तोमर यांना साफसफाई करण्यास मदत केली. विशेष म्हणजे प्रद्युम्न तोमर यांनी याआधी सुद्धा अनेकदा आपल्या मतदारसंघात नाल्याची साफसफाई केली आहेत.
आमदार तोमर यांनी काही दिवसांपूर्वी ग्वालियर येथील रेल्वे स्थानकात जाऊन शौचालयही साफ केले. त्यावेळी ज्याचे सर्वांनी कौतुक सुद्धा केले होते. मात्र असे असताना सुद्धा त्यांच्यावर काही लोकांनी त्यांच्या या कार्यासाठी विरोध केला आहे. एखांद्या मंत्र्यांनी कोणतेही हातमोजे किंवा बूट न घालता नाल्यात उतरणे चुकीचे उदाहरण सादर केल्या सारखे असल्याचे बोलले जात आहे.