मुंबई : गुगलसारखे सर्च इंजिन कधी-कधी एवढ्या चुका करते की, पाहणाराही थक्क होऊन जातो. आता हेच पाहा भारताचे पहिले पंतप्रधान म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव येते; पण गुगल सर्च इंजिनवर मात्र आपल्याला पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचे छायाचित्र पाहावयास मिळते. आश्चर्य म्हणजे दहा क्रिमिनल पंतप्रधानांचा जर गुगलवर शोध घेतला, तर मोदींचे छायाचित्र या यादीत दिसते.असेच अनेक अजबगजब प्रकार गुगलवर दिसतात. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून जर सर्च केले तर माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा फोटो स्क्रीनवर येईल. ममता बॅनर्जींऐवजी तुम्हाला पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचे छायाचित्र दिसेल. अखिलेश यादव यांच्याबाबत माहिती घेण्यासाठी गुगलवर आपण सर्च केले, तर आपल्याला चक्क माजी मुख्यमंत्री चरणसिंग यांचा फोटो दिसेल. विश्वासार्ह सर्च इंजिन म्हणून गुगलची ओळख आहे; पण गुगलच्या या गुगलीने भले-भले थक्क झाले आहेत.
नरेंद्र मोदी जेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान बनतात!
By admin | Published: October 16, 2015 4:03 AM