मल्हारीकांत देशमुख ल्ल परभणी
परभणीनजीक आसोला परिसरातील मातोश्री वृद्धाश्रम स्वत:च विकलांग बनला असून, शेवटची घटिका मोजतो आहे. पूर्णत: मोडकळीस आलेल्या इमारतीभोवती जंगल वाढले असून, अवघे तीन निराधार बापुडे कुठलाच सहारा नसल्यामुळे जीव मुठीत धरून वास्तव्यास असल्याचे विदारक चित्र आहे. कुठल्याही मनुष्यप्राण्याने राहावे, अशी ही वास्तू राहिलेली नाही. विद्याथ्र्याच्या शालेय पोषण आहारावर तिघांचीही गुजरान होत आहे.
युती शासनाच्या काळात आ. दिवाकर रावते यांच्या पुढाकारातून 1999मध्ये मातोश्री वृद्धाश्रम परभणी जिल्ह्यातील आसोला परिसरात उभारण्यात आला होता. पहिल्याच वर्षी या आश्रमात 65 वृद्धांना प्रवेश देण्यात आला होता. पुढे सत्तांतर झाले आणि 2क्क्1पासून या वृद्धाश्रमाचे अनुदान शासनाने बंद केले. मागील 13 वर्षात या ठिकाणच्या वृद्धांची गळती होत गेली. आता या आश्रमात केवळ तीन वृद्ध उरले आहेत. ग्यानोजी भरोसे, राम मोघे यांच्याबरोबर वासंती लवंदे या महिलेचा त्यात समावेश आहे. मातोश्रीचा शेवटचा आधार म्हणजे माजी खा. तुकाराम रेंगे पाटील. परंतु त्यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर हा आश्रम उघडय़ावर आला. नाही म्हणता आश्रमाशेजारीच माजी खा. रेंगे पाटील यांची शिक्षण संस्था आहे. संस्थेवरील कर्मचारी बांधिलकीच्या नात्यातून या वृद्धांना जेवण देतात. शालेय पोषण आहारातील खिचडी तेवढी या वृद्धांना मिळते. 1क् वर्षापासून आश्रमाकडे कोणीही फिरकले नसल्याची खंत येथे राहणा:या वृद्धांनी व्यक्त केली.
बांधिलकी ओसरली : शासनाने अनुदान बंद केल्यामुळे संस्था उद्ध्वस्त झाली. त्यापाठोपाठ समाजानेदेखील पाठ फिरविली. एकेकाळी सामाजिक कार्यकर्ते सणा-वाराला वृद्धाश्रमावर जाऊन वृद्धांना गोडधोड खाऊ घालायचे. त्यांची विचारपूस करायचे. आज घडीला तिकडे कोणी फिरकताना दिसत नाही.
माङो भावनिक
संबंध कायम - रेंगे
वृद्धाश्रमाचे तत्कालीन अध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे यांच्याशी संपर्क साधला असता, मी पक्ष बदलला असला तरी या संस्थेशी माङो भावनिक संबंध आजही कायम आहेत. त्या ठिकाणच्या वृद्धांना मी माङया परीने मदत करीत आलो आहे.
गतवर्षी ऐन दिवाळीत एका वृद्धाचा मृत्यू झाला. माङया सहका:यांसोबत मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होतो. आजघडीला माङयाकडे कुठलेही मोठे पद नाही.
त्यात इमारतीची होत असलेली पडझड मी थोपवू शकत नाही. प्रशासनाने हा वृद्धाश्रम बंद करण्याची भूमिका घेतली होती. परंतु या ठिकाणच्या वृद्धांना निराधार करायला नको होते म्हणून मीच तो सुरू ठेवलेला
आहे.
च्चौदा वर्षापूर्वी बांधलेल्या या वास्तूला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सबंध इमारतीतील फरशी उखडली गेली आहे. खोल्यांची दयनीय अवस्था झाली असून, दारे-खिडक्या लोकांनी काढून नेल्या आहेत. बिल भरले नसल्याने महावितरणने वीजजोडणी तोडल्यामुळे सद्य:स्थितीला अंधारात राहण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.
च्पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शेजारच्या शाळेतून पाणी आणावे लागते. आश्रम सुरू झाल्याच्या दिवसापासून वास्तव्याला असणा:या ग्यानोजी भरोसे यांनी सोबतची माणसं डोळ्यांदेखत बेहाल होऊन निघून गेली किंवा मरण पावली. आम्हीच तेवढे हाल भोगत आहोत, हे सांगताना तिन्ही वृद्धांना रडू कोसळले. तत्कालीन व्यवस्थापक गोविंद जावळे व संस्थेचे कर्मचारी बांधिलकीच्या नात्याने त्यांची व्यवस्था करतात.