शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कोई जब तुम्हारा हृदय तोड दे... !

By admin | Published: January 31, 2017 2:21 AM

सदाशिव पेठेतल्या निळूभाऊंचा ‘अंग्रेज के जमाने का रेडिओ’ पुरता बिघडला होता. बटण चालू केलं की एकाचवेळी दोन बॅण्ड लागायचे. बातम्या ऐकत असताना मध्येच दुसऱ्या बॅण्डचं

-  सचिन जवळकोटे

सदाशिव पेठेतल्या निळूभाऊंचा ‘अंग्रेज के जमाने का रेडिओ’ पुरता बिघडला होता. बटण चालू केलं की एकाचवेळी दोन बॅण्ड लागायचे. बातम्या ऐकत असताना मध्येच दुसऱ्या बॅण्डचं गाणं वाजायचं. गाणी लावली तर मध्येच ठळक बातम्या कानावर पडायच्या... तरीही निळूभाऊंनी या ‘टू ईन वन’ डबड्याशी अ‍ॅडजेस्टमेंट करून घेतली होती. आजही त्यांनी बातम्या लावल्या त्याचवेळी त्यांना गाणीही ऐकू येऊ लागली. योगायोग म्हणजे, अगोदरची बातमी नंतरच्या गाण्याशी परफेक्ट मॅच होत गेली. बातमी : नमस्कारऽऽ आठवडाभरातल्या ठळक बातम्या. मुंबईत आमच्या हक्काच्या जागा मागणारी ही ‘कमळाबाई’ कोण?.. ‘बाण’वाल्यांचा जोरदार सवाल. गाणं : मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैऽऽ... जो है नामवाला वहीं तो बदनाम है! बातमी : आता आपण दुसऱ्या बातमीकडं वळू या. ‘बाण’वाल्यांच्या भूमिकेवर संतप्त होऊन ‘आशिष-सोमय्या’ जोडगोळीचा पलटवार. ‘युती नको!’चा जोरदार नारा. गाणं : तेरी गलियों में नां रखेंगे कदम, आज के बादऽऽ... तेरे मिलने को ना आयेंगे सनम, आज के बादऽऽ. बातमी : अखेर दोस्ती तुटली. युती फिसकटली. ‘मातोश्री’ अन् ‘वर्षा’ आमने-सामने. गाणं : दोन हंसो का जोडा बिछड़ गयो रेऽऽ.. गजब हुआ रामाऽऽ गजब हुयो रेऽऽ बातमी : इतके दिवस हातात हात घालून फिरणारे नेते आता एकमेकांची ‘औकात’ काढू लागले. गाणं : आ देखे जराऽऽ किस में कितना है दम... बच के रखना कदमऽऽ मेरे साथियाँऽऽ बातमी : इतक्या वर्षांची युती तुटल्यामुळे म्हणे थोरले बारामतीकर काका दु:खी. गाणं : जो हमने दास्ताँ अपनी सुनायी... आप क्यों रोये? तबाही तो हमारे दिल पे आयी... आप क्यों रोये? बातमी : पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे मुखवटे फाडणार. एकाच ठोश्यात समोरच्यांचे दात पाडणार. ‘मातोश्री’वरून घोषणा. गाणं : आज नां छोडूंगा तुझेऽऽ दम दमा दम... दिल में है तुफान भराऽऽ दम दमा दम. बातमी : सरकारमधील मित्रपक्ष मात्र ‘कमळाबाई’सोबतच. सदाभाऊंचीही देवेंद्रपंतांनाच साथ. गाणं : आप की नजरो नें समझा, प्यार के काबिल मुझेऽऽ... दिल की ये धडकन ठहर जा, मिल गयी मंझिल मुझेऽऽ...बातमी : वेळ पडली तर ‘घड्याळ’ म्हणे ‘कमळाबाई’सोबत राहणार. गाणं : आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे है हर जुबाँ परऽऽ.. सबको मालूम है और सबको खबर हो गयी...बातमी : आता शेवटची बातमी. ‘धनुष्य’ सावरण्यासाठी ‘इंजिन’ची धावपळ. ‘मातोश्री’च्या मदतीला म्हणे ‘कृष्णकुंज’ धावणार. गाणं : कोई जब तुम्हारा हृदय तोड दे... तडपता हुआ जब कोई छोड देऽऽ... तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है, खुलाही रहेगाऽऽ... तुम्हारे लिये!