मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. सरकारी कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता झाला असून, एसटी कर्मचाऱ्यांना अजून २८ टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत आहे.
मुख्यमंत्री, परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे हे आहेत. पूर्वी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष असे चार स्तर असायचे व फाईल मंजुरीसाठी खूप वेळ लागायचा. आता मुख्यमंत्र्यांकडेच कारभार असल्याने फायदा होईल.
प्रलंबित महागाई भत्ता तत्काळ मिळण्यासाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.