लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नोटाबंदीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शेतक-यांनी हजारो कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी जमा केल्या. मात्र केंद्र सरकारने हे पैसे स्वीकारण्यास नकार दिल्याने जिल्हा बँका अडचणीत सापडल्या आहेत.त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या प्रश्नावर मार्ग काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. जीएसटी विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना अजित पवार बोलत होते.नोटाबंदीनंतर शेतक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांत हजारो कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जमा केल्याचे सांगून अजित पवार म्हणाले,केंद्र सरकारने मात्र हे पैसे स्वीकारण्यास नकार दिला आहे.जिल्हा बँकांसमोर यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन दिले होते.मात्र अदयाप यावर काही निर्णय नाही, असे अजित पवार म्हणाले. मी ते भोगले आहेमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना निर्लज्ज हा शब्द वापरला होता. त्याचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले की, सत्ताधा-यांनी बोलताना शब्द जपून वापरायचे असतात. एखादा नको असलेला शब्द तोंडातून निघून गेल्यानंतर काय होते हे मी चांगलेच भोगले आहे. अजितदादांचा रोख भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर होता.
शेतकऱ्यांचा पैसा सरकार कधी स्वीकारणार?
By admin | Published: May 22, 2017 12:32 AM