इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:27 AM2020-01-16T11:27:50+5:302020-01-16T11:29:29+5:30
पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह संपूर्ण नेहरू गांधी परिवाराचा आम्ही विरोधी पक्षात असूनही नेहमीच आदर केला आहे.
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यातील भेटीबाबत केलेल्या विधानावरून वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आज संजय राऊत यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
इंदिरा गांधींविषयीच्या संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला
उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसले
इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यातील भेटीबाबतच्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, ''इंदिरा गांधींबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. मी केलेल्या त्या विधानाबाबत म्हणायचे तर करीम लाला हे अफगाणिस्तानातून आले होते. त्यांची पश्तून ए हिंद नावाची संघटना होती. सरहद्द गांधी म्हणून ओळख असलेल्या खान अब्दुल गफ्फार खान यांच्याशी करीम लाला जोडलेले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत. तसेच भारतातील पठाणांच्या समस्यांबाबत ते इंदिरां गांधींना भेटले होते.''
Sanjay Raut, Shiv Sena: Many political people used to come to meet Karim Lala, times were different back then. He was a leader of the Pathan community, he had come from Afghanistan. So, people used to meet him over the problems faced by the Pathan community. https://t.co/4X45RmimEjpic.twitter.com/kZvnMnQiLc
— ANI (@ANI) January 16, 2020
दरम्यान, ''पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह संपूर्ण नेहरू गांधी परिवाराचा आम्ही विरोधी पक्षात असूनही नेहमीच आदर केला आहे. जेव्हा कधी इंदिरा गांधींवर टीका झाली तेव्हा मी त्यांना पाठिंबा दिला आहे.''असे राऊत यांनी सांगितले.
Sanjay Raut, Shiv Sena in Mumbai: The respect that I have always shown towards Indira Gandhi, Pandit Nehru, Rajiv Gandhi & the Gandhi family, despite being in opposition, nobody has done it. Whenever people have targeted Indira Gandhi, I have stood up for her. pic.twitter.com/1cDSq9AZci
— ANI (@ANI) January 16, 2020
दरम्यान, छत्रपतींच्या वंशजांबाबत केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, ''छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आणि देशाचे नव्हे तर विश्वाचे दैवत आहे. आम्हाला शिवरायांबाबत सार्थ अभिमान आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नाही.''