मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यातील भेटीबाबत केलेल्या विधानावरून वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आज संजय राऊत यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
इंदिरा गांधींविषयीच्या संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला
उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसलेइंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यातील भेटीबाबतच्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, ''इंदिरा गांधींबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. मी केलेल्या त्या विधानाबाबत म्हणायचे तर करीम लाला हे अफगाणिस्तानातून आले होते. त्यांची पश्तून ए हिंद नावाची संघटना होती. सरहद्द गांधी म्हणून ओळख असलेल्या खान अब्दुल गफ्फार खान यांच्याशी करीम लाला जोडलेले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत. तसेच भारतातील पठाणांच्या समस्यांबाबत ते इंदिरां गांधींना भेटले होते.''