शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

पालक म्हणून कुठे कमी पडतोय आम्ही?  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 11:19 AM

गेल्या काही दिवसांत दर एक दिवसाआड एका बालकाने आयुष्य संपवलं. गेल्या पंधरवड्यात अशा बातम्या वर्तमानपत्रातून वाचताना मन अतिशय विषण्ण झालं आणि स्वतःलाच परत परत का घडले असे?, व्यथित होऊन सारखं विचारू लागलं !

- महेश माणिकराव डोलारे (मानव संसाधन विशेषज्ञ, छत्रपती संभाजीनगर)

आपला मुलगा / मुलगी जास्तीत जास्त वेळ मित्र / मैत्रिणीशी बोलेल, नातेवाइकांकडे राहील/जाईल किंवा त्यांच्या संपर्कात राहील, हे आपण त्याला आपल्या वर्तनातून शिकविले पाहिजे. जेव्हा कुणीतरी जवळचं वाटणारं असतं तेव्हा कोणताही पाल्य हा उद्विग्न अवस्थेत पोहोचूच शकत नाही. तेव्हा माझ्या प्रिय पालक मित्रांनो, जागे व्हा आपल्या पाल्याशी सतत संवाद साधा. या संवादातूनच तुम्ही त्यांच्या मनातील अविचारांची चलबिचल ओळखू शकता आणि त्यावर योग्य ते उपचार करू शकता.... तुम्हीच त्यांचे डॉक्टर बना आणि या उपरही तुम्हाला अगदीच गरज भासली तर एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास लाजू नका. कानकूस करू नका. कारण ही फक्त मनाची एक अवस्था आहे आणि आपल्याला त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढायचं आहे. येथे मला बहिणाबाईंची एक कविता आठवते...मन वढाय वढाय मन जारी जारी,याचं न्यारे रे तंतर। इचू साप बरा, त्याले उतारे मंतर

गेल्या काही दिवसांत दर एक दिवसाआड एका बालकाने आयुष्य संपवलं. गेल्या पंधरवड्यात अशा बातम्या वर्तमानपत्रातून वाचताना मन अतिशय विषण्ण झालं आणि स्वतःलाच परत परत का घडले असे?, व्यथित होऊन सारखं विचारू लागलं ! जीवन जगले नसताना, किंबहुना ते कसे जगायचे हे पूर्णपणे उमगले नसताना ते संपवावे असे का वाटले आणि ते कसे संपवावे हे ही मुलं न सांगता शिकलीसुद्धा! या उद्विग्न निर्णयाप्रत ही मुलं एकदम पोहोचली का? कदापि शक्य नाही ते !!

विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांत मानव संसाधन विभागात काम करताना आम्ही नेहमी सर्व विभागप्रमुखांना हे शिकवितो की एखादा कर्मचारी अचानक कधीही कंपनी सोडत नाही. आधी त्याची मानसिकता (मग ती कोणत्याही कारणासाठी असो) तयार होते आणि मग ती काही दिवस / महिन्यांत निर्णयात्मक स्थितीत पोहोचते आणि एखाद्या जागरूक विभागप्रमुखास त्या कर्मचाऱ्याची अवस्था / मानसिकता तत्काळ ओळखता येते आणि तो लगेच तो कर्मचारी सोडून जाऊ नये यासाठीचे प्रयत्न सुरू करतो. 

माझ्या मते, अगदी अशीच काही अवस्था या निष्पाप मुलांची होत असणार. ती जेव्हा अशा उद्विग्न अवस्थेत असतात तेव्हा नक्कीच त्यांच्या दिनचर्येत / वर्तनात फरक पडतो. नेहमी चिडचिड करणारी मुले शांततेने वागू लागतात आणि अगदी विरुध्द म्हणजे शांत स्वभावाचे मुले रागराग करू लागतात. या मोठ्या बदलाशिवाय अनेक छोटे बदल जसे की- जेवणातील बदल, झोपेची अनियमितता, अलिप्तपणा आदी प्रकर्षाने घडू लागतात आणि या सर्व गोष्टी घडताना आम्ही पालक असतो कुठे? आमचं आमच्या मुलांकडे खरंच लक्ष असतं का? त्यांच्यातील बदल आम्ही वेळीच का टिपू शकत नाही?

मीही एक पालक आहे आणि त्या भावनेतूनच माझे विचार व्यक्त करीत आहे. आमच्याही घरात १० ते २२ वर्ष अशा वयोगटातील मुले आहेत आणि त्यांचे संगोपन म्हणजे आम्हा सर्वांसमोरील एक मोठे आव्हान आहे. आम्ही घडलो तसेच आपले मुले घडतील या भ्रमात आपल्याला राहता येणार नाही. सुखसुविधांच्या अभावी आम्ही नाही का चांगले वाढलो? आणि सर्व सुखसुविधा असतानाही आमची मुले का व्यवस्थित घडत नाहीत, या प्रश्नाचे जास्त उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत बसू नये.

सोशल मीडिया आता आपला अविभाज्य भाग होऊन बसला आहे आणि ते आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा करता येणे शक्य नाही. त्यामुळे जेवढे आपण मुलांच्या पूर्णपणे जवळ, तेवढा तो सोशल मीडियाला स्वतःपासून कदाचित दूर ठेवू शकेल. त्यामुळे मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल, याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यांच्यातील बदल आपल्याला लगेच हेरता येतील व वेळीच आपण त्यांना नकारात्मक अवस्थेतून बाहेर काढणे सहज शक्य होईल.

 

टॅग्स :Educationशिक्षण