आॅनलाईन खरेदी : मनपाकडे लेखाजोखा नाहीवसीम कुरैशी -नागपूरआॅनलाईन व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारा एलबीटी मनपाच्या तिजोरीत जमा होत नसल्याची अधिकृत माहिती आहे. माल कुठून कसा आला आणि कुणापर्यंत पोहोचला, याची नोंद मनपाकडे नाही.शहरातील कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून पाठविलेला माल संबंधितांपर्यंत पोहोचत आहे, पण त्याचे शुल्क मिळत नाही. शहराबाहेर पाठविण्यात आलेल्या मालाच्या नोंदणीसाठी मनपाने कार्यालय सुरू न केल्याने या व्यवसायातून प्राप्त होऊ शकणारा एलबीटी मनपाकडे गोळा होत नाही. यासंदर्भात एलबीटी विभागाचे डोळे उघडले असले तरीही या व्यवसायावर अधिकारी अजूनही लक्ष केंद्रीत करू शकले नाहीत.दिल्ली, चेन्नई आणि कोलकातासह अन्य शहरांतून आॅनलाईन माल पाठविण्याची शृंखला सुरूच आहे. एलबीटीच्या नियमात डीलरच्या परिभाषेचे पालन करण्यात येत असल्याने अशा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या अधिकाऱ्यांच्या टप्प्याबाहेर आहेत. मनपाच्या सीमेबाहेरून शहरांत ग्राहकांपर्यंत माल पाठविण्यात येत आहे. आॅक्ट्रायच्या व्यवस्थेंतर्गत वस्तूनिहाय माल कराच्या टप्प्यात येतो. एकंदरीत पाहता डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायामुळे मनपाला लाखोंच्या एलबीटीवर पाणी सोडावे लागत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. १ एप्रिल २०१४ पासून एलबीटीची अंमलबजावणी झाली. थेट माल पाठविणाऱ्या कंपन्यांनी नोंद आणि शहरात किती लोक हे काम करीत आहेत, याची माहिती मनपाच्या एलबीटी विभागाकडे नाही. या व्यवसायातून वसूल होणाऱ्या एलबीटीची आकडेवारी एलबीटी विभागाचे अधिकारी देऊ शकले नाहीत.एलबीटी क्रमांक असलेल्या व्यापाऱ्यांकडून विभागाने १७३ कोटी रुपयांचा एलबीटी वसूल केला आहे. गेल्यावर्षी ९ सप्टेंबरपर्यंत ६२ कोटी गोळा झाले होते. (प्रतिनिधी)एलबीटी विभाग व रिटेलर त्रस्तडोळेझाक करून ग्राहकांपर्यंत सुरळीत पोहोचणाऱ्या मालामुळे मनपाचा एलबीटी विभाग हैराण आहे तर दुसरीकडे एलबीटीचा नोंदणी क्रमांक घेतलेले व्यापारी विक्री घटल्यामुळे त्रस्त आहेत.शहरात येणारा मालडायरेक्ट मार्केटिंगद्वारे मोबाईल, प्रेस, ओव्हन, छोटे पंखे, मिक्सी, हेअर ड्रायर, मसाज मशीन, जीममधील मशीनरी, गॅस शेगडी, कपडे वाळविणारी शेगडी, अनेक प्रकारची औषधी आदी वस्तू शहरात येत आहेत.
अखेर एलबीटी गेला कुठे?
By admin | Published: September 15, 2014 1:01 AM