पिंपरी (पुणे) : केंद्र आणि राज्य सरकारकडून केवळ योजनांच्या घोषणाच होताहेत, प्रत्यक्षात सकारात्मक चित्र दिसत नाही. शेतकरी दुष्काळाने होरपळला असून आत्महत्या करताहेत. उद्योग संकटात आहेत. कामगारांना भविष्याची चिंता आहे... आता त्यांच्याच भाषेत बोलायचे, तर ‘कु ठं नेऊन ठेवलाय भारत माझा?’ हेच का ते अच्छे दिन, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.थेरगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘नदी स्वच्छता, नदी जोड, रेल्वे, रस्ते असे विविध प्रकल्प, अभियानांच्या घोषणा सुरू आहेत. पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट सिटी योजनेची सुरुवात होणार आहे. त्यांनी बाणेर रस्ता, बालेवाडी परिसर निवडलाय.स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड शहराला वगळण्यात आले. हा भाग मुळातच स्मार्ट आहे, अशा शहराचा समावेश केला असता, तर अधिक चांगल्या पद्धतीने शहराचा विकास झाला असता, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)
कुठं नेऊन ठेवलाय भारत माझा?
By admin | Published: June 25, 2016 4:00 AM