ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि १८ - नगरपरिषदेच्या निडणुकीची अचारसंहिता जिथं निवडणूक आहे तिथंच लागू करावी. ग्रामीण व महापालिका क्षेञात अचारसंहिता लागू झाल्याने विकास कामे ठप्प होणार आहेत, त्यामुळे जिथं निवडणूक प्रक्रिया चालू आहे तिथंच अाचारसंहिता लागू करा व अन्यञ लावलेली अचारसंहिता निवडणूक अयोगाने मागे घ्यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी आज करमाळयात केली.
नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी पवार बोलत होते.
नगरपरिषद व जि.प.पं.सं च्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकतीनिशी लढवणार असून पक्ष ६० टक्के जागा नवा चेहरा असलेल्या युवकांना निष्कलंक व समाजात मिसळणा-यांना उमेदवा-या द्या. गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनतेचा विकासाबाबत भ्रमनिरास केला आहे. याचा फायदा निडणूकीत घ्या असे अवाहन पवार यांनी केले. यावेळी रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आ.शामलताई बागल रश्मी बागल, दिग्विजय बागल आदीसह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.