शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेनेचा काेणता गट मोठा ठाकरे की शिंदे? दसरा मेळाव्यानंतर ठाकरे व शिंदे गटात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 6:34 AM

आम्ही म्हणतोय पक्षाची संपूर्ण ताकद आमच्याकडे आहे, आमचाच मूळ पक्ष आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेला आमचा जो दसरा मेळावा झाला, त्याला किती लोक होते आणि त्यांच्याकडे किती लोक होते? हे सगळ्यांनी बघितलेले आहे. 

अरविंद सावंत, खासदार, शिवसेनाखरंतर कोणाचा गट मोठा की खरा, हा माझा प्रश्न आहे. कारण त्यांच्या मेळाव्याला कोण लोक होते ते तुम्ही पाहिले आहे. कारण आपण कुठे आलोय, कुणासाठी आलोय, कुणाचे भाषण ऐकायला आलोय, याची माहिती नसलेल्या लोकांना नेऊन सदस्यत्वाचे अर्ज भरले असतील तर त्या मोठ्या आकड्याला काय किंमत आहे? 

पक्षाची सदस्य नोंदणी ही पक्षाशी बांधिलकी असलेल्या लोकांची असायला लागते. त्यांच्या मेळाव्याला गेलेल्या काही लोकांनी सांगितले की, आम्ही उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला आलो आहे, कुणाचा कुणाला मेळ नाही. मी समजा काही ठिकाणी फिरलो, ५० रुपये देतो सांगितले आणि अर्ज भरून घेतले तर आयत्या वेळी १० हजार अर्ज भरू शकतो. भाजपने केले होते मिस कॉल द्या आणि पक्षाचे सदस्य व्हा. त्याचे काय झाले? मग खरे सदस्य कोणाचे? आमच्या सोबत आकडाही मोठा आहे, ते सोडून द्या; पण प्रश्न आहे खरी सदस्यता कोणाची? आमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आकडा आहे आणि खराही आहे. आम्ही सत्यप्रत निवडणूक आयोगाकडे सादर केली. ते आता काहीही दावा करतात. प्रत्यक्ष सुनावणीवेळी बघू ना. चिन्ह आमचेच आहे ते काढून घेऊ नये, असे आमचे निवडणूक आयोगापुढे म्हणणे असेल.

किरण पावसकर, प्रवक्ते, शिंदे गट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पक्ष चिन्हाचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहोचलेले आहे. त्यामुळे आता आपल्या मनात एकच प्रश्न राहतो की, जे मतदार उन्हा-पावसात उभे राहून कुठल्याही पक्षाला मतदान करतात त्यांना कुठे तरी न्याय देण्याची गरज आहे. त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर हा निर्णय झाला पाहिजे. निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची सगळी कागदपत्रे सादर केली आहेत.

विरोधी गट मात्र वेळकाढूपणा करत आहे. ते मुदत मागत आहेत. निवडणूक आयोगाने मतदार जास्त कुणाकडे आहे हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आमचे म्हणणे आहे. गट, आमचा मोठा आहे. आमदार जास्त कोणाकडे आहेत, तर ४० आमदार आणि काही अपक्ष आमदारही आमच्याकडे आहेत. १२ खासदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे यांना निवडून देणारे मतदार आहेत त्यांना निवडणूक आयोग न्याय देणार आहे का?, हा खरा प्रश्न आहे. त्याशिवाय १४ राजकीय प्रतिनिधी, ११ राज्य प्रभारी आणि १ लाख ६६ हजारांहून अधिक प्राथमिक सदस्य आमच्याबरोबर आहेत. त्यामुळेच धनुष्यबाण त्यांनी वापरू नये यासाठी आमचा हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही म्हणतोय पक्षाची संपूर्ण ताकद आमच्याकडे आहे, आमचाच मूळ पक्ष आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेला आमचा जो दसरा मेळावा झाला, त्याला किती लोक होते आणि त्यांच्याकडे किती लोक होते? हे सगळ्यांनी बघितलेले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे