मुंबई : टोलवसुली बंद झाल्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना लक्ष्य केले होते. आता फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस यांनी टोलबंदीबाबत केलेल्या एका वक्तव्याची व्हिडीओ क्लिपही राज ठाकरे यांनी दाखविली. त्यावर महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर २०१५ पासून टोलवसुली बंद झाली, याची आकडेवारी फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
- सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ टोल नाके, तसेच महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाच्या २६ टोल नाक्यांवरील अशा एकूण ५३ टोल नाक्यांवरील कार, जीप व एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना ३१ मे, २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून टोलमधून सूट देण्यात आली आहे.- या संदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेऊन त्याचा जीआरही ३१ ऑगस्ट, २०१७ रोजी जारी केल्याचे फडणवीसांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.