जयंत धुळप,
अलिबाग- आपल्या औषधी गुणधर्मामुळे गेल्या १०० वर्षांपासून देशात प्रसिध्द असलेल्या अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील ‘पांढऱ्या’ कांद्याचे सर्वांनाच आकर्षण असते. विशिष्ट पद्धतीने विणलेल्या या पांढऱ्या कांद्याच्या माळांना बाजारपेठेत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदा अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील २०० हेक्टर शेतजमिनीवर ४५० शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड केली असल्याची माहिती अलिबाग तालुका कृषी अधिकारी बी. एस. जानुगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.जमिनीला मुळत:च असणाऱ्या खारवटपणामुळे या पांढऱ्या कांद्याची चव तिखट नसून गोड आहे आणि म्हणूनच हा पांढरा कांदा खारेपाटातील शेतजमिनीतच होत असतो. परिणामी त्याच्या उत्पादनावर मर्यादा असते. हेक्टरी सुमारे २२ क्विंटल उत्पादकता असणाऱ्या या पांढऱ्या कांद्याचे यंदाच्या हंगामात एकूण ४ हजार ४०० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. लागवडीखालील क्षेत्रापैकी ६५ टक्के क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील सतीश व रंजना म्हात्रे या म्हात्रे कुटुंबीयांनी पांढऱ्या कांद्याच्या लागवडीत मोठी किमया केली असून त्यांनी एक हेक्टरमध्ये कांदा लागवड करून ३० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यातून सुमारे चार लाख रूपये मिळणे त्यांना अपेक्षित आहे. लागवड औषधे, खते, मजुरी आदींचा खर्च भागवून नफा होईल असा त्यांना विश्वास आहे. म्हात्रे कु टुंबाची पाचवी पिढी पांढऱ्या कांद्याची लागवड करीत असून गेल्या शंभर वर्षांची परंपरा त्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. पांढऱ्या कांद्याचे अधिक उत्पादन यावे याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, तालुका कृषी अधिकारी जानुगडे, सचिन भोईर आदींनी मार्गदर्शन केल्याचेम्हात्रे म्हणाले. >450शेतकऱ्यांनी अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील गावांमध्ये २०० हेक्टर शेतजमिनीवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. या कांद्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आयुर्वेदामध्येही या कांद्याला विशेष महत्त्व आहे.65टक्के क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे तर काही क्षेत्रातील पांढरा कांदा तयार होवून बाजारात देखील आला आहे. आता हा पांढरा कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात येणार असल्याने त्याला भाव देखील चांगला मिळेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी चांगल्या उत्पन्नासाठी प्रयत्न करत आहेत.400रु पयांना गतवर्षी आठ किलो (एक मण) पांढरा कांदा प्रारंभीच्या काळात तर अखेरच्या काळात ३०० रुपयांनी विक्री के ल्याचेपवेळ- खंडाळा येथील महिला शेतकरी नीता नंदू सोडवे यांनी सांगितले.>चांगली विक्रीपांढऱ्या कांद्याची लागवड, उत्पादनाकरिता म्हात्रे परिवाराने या परिसरातील महिलावर्गाला सुमारे तीन महिने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे म्हात्रे कुटुंबीयांनी उत्पादित केलेला कांदा रायगड जिल्ह्यासह मुंबई, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आदी ठिकाणीही गतवर्षी पोहोचला आहे. गतवर्षी मुंबईमधील मॉलमध्ये कांद्याची चांगली विक्री झाली.