शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
3
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
4
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
6
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
8
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
9
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
10
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
11
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
12
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
13
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
14
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
16
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
17
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
18
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
19
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
20
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर

तक्रारी ऐकण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप सेवा

By admin | Published: November 16, 2016 5:56 AM

देशातील काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि बनावट नोटा यांचा कणा मोडण्यासाठी केंद्राने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द

तक्रारी ऐकण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप सेवामुंबई : देशातील काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि बनावट नोटा यांचा कणा मोडण्यासाठी केंद्राने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्व सामन्य नागरिकांना येणाऱ्या अनेक अडचणीं, तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झाले आहेत. राज्यातील पोलीस आयुक्तालये आणि पोलीस जिल्हा मुख्यालयांच्या स्तरावर प्रत्येकी दोन मोबाईल नंबर नागरिकांच्या सेवेत आणले आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेने पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे जुन्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी बँका आणि एटीएमवर गर्दी केली आहे. तसेच पेट्रोलपंप, रेल्वे स्थानके, प्रशासकीय कार्यालये, हॅस्पीटल, मेडीकल याठिकाणीही नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा तक्रारी करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस, कॉल करण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र नंबर दिला आहे. या तक्रारी संबधित प्राधिकरणांना पाठवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले. नोटांवरून सुरू असलेल्या राजकारणानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा नक्कीच फायदा जनतेला होणार असून काळ्या पैशांच्या व्यवहार, अवैध देवाण-घेवाणीची माहितीही पोलिसांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)

जाहीर केलेले नंबर-राज्य पोलीस नियंत्रण कक्ष - ७५०६७७७१००, ५०६८८८१००, मुंबई पोलीस-७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४, नवी मुंबई - ८४२४८२०६६५, ४२४८२०६८६, ठाणे शहर - ९७६९७२४१२७, ९९६९३६५१००, नागपुर शहर - ८०५५८७६७७३,८०५५४७२४२२, नाशिक शहर- ८३९०८२१९५२, ८३९०८२२३५२, ९९२३०७८६९६, आरंगाबाद शहर-८३९००२२२२२, ७७४१०२२२२२,ठाणे ग्रामीण- ७०४५१००१११, ७०४५१००२२२, पालघर -९७३०८११११९, ९७३०७११११९, रायगड - ७०५७६७२२२७,७०५७३६२२२६, रत्नागिरी - ८८८८५०६१८१, ८८८८९०५०२२, सिंधुदूर्ग - ८२७५७७६२१३,८२७५७७६२१६, मुंबई रेल्वे - ९८३३३१२२२२. या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.