राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिची हत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार नुकताच घडला. जवळचा मानल्या गेलेल्या व्यक्तीकडून असे कृत्य घडणे हे त्याहून वाईट आहे. या घटनेने समाजाला सुन्न केले. यातून धडा घेत मानसिक प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टीने काही आश्वासक उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. ते समजून घेण्याच्या दृष्टीने राजकीय सल्लागार किशोर रक्ताटे आणि आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नात्याची ही कहाणी.माझ्या आणि माझ्या बायकोत अनेक विषयांमध्ये लग्नापूर्वी आणि आताही मतभेद होतात; पण, आमची मतभेदांची चर्चा कधीच मनभेदाकडे जात नाही. बायकोला जी प्रतिष्ठा मिळते, ती ज्या पदावर काम करते, त्याचा मला त्रास होत नाहीच; उलट अभिमान वाटतो. असेच प्रत्येकाला वाटले, तर सहजीवनात वितुष्ट येण्याऐवजी नातं फुलत, बहरत जाईल, हे निश्चित.
प्रत्येकाला समोरील व्यक्तीच्या कल्पनांचा, भूमिकांचा, विचारांचा सन्मान, आदर करता आला पाहिजे. ते आपल्या मनाला पटलेच पाहिजेत असे नाही. नातं टिकतंच कशावर? तर एकमेकांच्या गुणांचा आदर करण्यावर तुम्हाला तुमच्या नात्यात पार्टनरमध्ये असलेल्या विशेष गुणांना ओळखता आले पाहिजे आणि ते फुलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच वेळी दुसरीकडे आपापल्या मर्यादा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रूढ अर्थाने नातं तयार होताना विचारांवर, आयुष्यावर बोललंच जात नाही. सहवासातून प्रेम होत असते, असे मानले जाते. जी चुकीची संकल्पना आहे. त्यामुळे पुढे नको त्या गोष्टी घडतात.
माझा मोबाइल नंबर डायल केल्यावर टू कॉलरला माझे नाव 'रक्ताटे सातपुते' असे येते. कितीतरी होत नाही. लोकांनी माझे नाव सातपुतेसाहेब म्हणून मोबाइलमध्ये सेव्ह असावं. माझी ओळख कोणीतरी हे 'सातपुते मॅडमचे मिस्टर' अशी करून दिलेली असते. त्यावर मी स्पष्टीकरण देत नाही. मला सातपुते म्हणण्यात काही खटकत नाही. मुलगी लग्न करून येते तेव्हा तिला पतीची ओळख लागते. तशीच जर पतीला पत्नीची ओळख लागत असेल तर त्यात गैर काय? उलट ही किती आनंदाची गोष्ट आहे. जसा माझ्या आडनावाचा तिला त्रास होत नाही, तसाच तो मलाही होत नाही.
समाजात मोठ्या जबाबदारीवर प्रतिष्ठेच्या जागेवर गेलेल्या स्त्रिया, शासनस्तरावर महत्त्वाच्या जागेवर काम
करणाऱ्या स्त्रिया या तुमची व कुटुंबाची खोलात जायला पाहिजे. प्रतिष्ठा वाढवणार असतील तर त्यातून तुम्हाला दुःख होण्याचे कारणच नाही. त्यासाठी आधी त्या व्यक्तीच्या विचार कसा करू शकता? तिच्या कलागुणांवर, त्याला मिळालेल्या जगण्याच्या हक्काचं आणि संधीवर विश्वास असला पाहिजे. तुमची नकाराच्या अधिकाराचं काय? कृती हाच संस्कार होऊ शकतो. दर्शना पवार हिच्या बाबतीत जे त्यामुळे छोट्या-मोठ्या स्त्री-पुरुष भेदांपलीकडे व्यवहार गेला पाहिजे; तरच आपण गुणांवर प्रेम करू आणि दोषांवर काम करून पुढे जाऊ शकतो. यासाठी आपल्या सभोवतालासमोर आपली समतापूर्वक कृती हाच संस्कार ठरू शकतो.
नकार आणि अपयश पचवता येणे हादेखील एक प्रकारचा संस्कार आणि शिक्षण आहे. ते देण्याची जबाबदारी कुटुंबाची आणि गुरुजनांची असते. एकतर्फी प्रेमातून समाजात घडणाऱ्या खून आणि आत्महत्येसारख्या घटना या मन सुन्न करणाऱ्या आहेत. खरं प्रेम हे त्यागभावनेच्या जवळ जाणारे असते. यात प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा खून करणे दूरच, त्याचे साधे नुकसान करण्याचा विचारदेखील मनाला स्पर्श करत नाही. आदर हा प्रेमभावनेचा पाया आहे. त्यामुळे ज्या प्रेमात आदर नाही, त्याला प्रेम तरी कसे म्हणावे? हा प्रश्न आहे. - तेजस्वी सातपुते, आयपीएस
गुणांवर प्रेम करु अन् दोषावर काम करू!- जगातील तीच नाती टिकतात- फुलतात, जी मतभेदापलीकडे जाऊन एकमेकांच्या गुणांवर प्रेम करतात आणि दोष घालवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करतात. एकमेकांचा आदर वाटला पाहिजे. त्यासाठी दुसया स्वभावाच्या व्यक्तिमत्त्वाच्या खोलात जायला पाहिजे. - ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, त्या व्यक्तीला तुम्ही मारण्याचा काही घडलं, त्यातून असं दिसतंय की, मारणाऱ्याला प्रेम ही संकल्पनाच कळली नसावी. त्यामुळे प्रेम करणायांनी प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतल्यास त्यातील खरा आनंद घेता येईल आणि जग सुंदर बनेल.
(शब्दांकन : रोशन मोरे)