शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

महाराष्ट्रातील हिंसाचाराचा खरा सूत्रधार कोण ? पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 2:26 PM

पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव, अमरावती, नांदेड आणि महाराष्ट्रातील इतर भागात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची रिपोर्ट गृह मंत्रालयाला सादर केला आहे. या रिपोर्टमधील काही माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, हिंसाचाराची संपूर्ण प्लॅनिंग फार पूर्वीच करण्यात आली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात आतापर्यंत सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या अशा 60-70 पोस्ट आढळून आल्या आहेत, ज्यांनी हिंसाचार भडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर त्रिपुरामध्ये 7 मशिदी पाडण्यात आल्याची बनावट पोस्ट करण्यात आली होती. यानंतर, व्हॉट्सअ‍ॅपवर हजारोंच्या संख्येने अनेक पोस्ट फॉरवर्ड करण्यात आल्या. याचा हेतू अधिकाधिक लोक या तथाकथित सुनियोजित दंगलीत जाणूनबुजून किंवा नकळत सहभागी व्हावे, असा होता. गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात अशा 36 सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आहे.

अशी होती दंगलीची टाइमलाइन29 ऑक्टोबर रोजी पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जातात. 1 नोव्हेंबर रोजी जय संविधान संघटनेनंही जिल्हाधिकार्‍यांकडे निषेध नोंदविला. 6 नोव्हेंबर रोजी सरताज नावाच्या व्यक्तीचा एक ऑडिओ मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. या ऑडिओद्वारे कथित चिथावणीखोर पद्धतीने म्हटले होते की, त्रिपुरातील अनेक मशिदी पाडण्यात आल्या असून हीच वेळ एकत्र येण्याची आहे. 

7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत रझा अकादमीने त्रिपुरातील घटनांबाबत राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक मेसेज फॉरवर्ड करण्यात आले. 12 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती, नांदेड आणि काही भागात बंदला सुरुवात करण्यात आली आणि दुकाने बंद न करणाऱ्यांवर हिंसाचार करण्यात आला. 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी काही राजकीय कार्यकर्त्यांकडून दिवसभर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आले आणि त्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा बंदचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :PoliceपोलिसTripuraत्रिपुराAmravatiअमरावतीNandedनांदेडMalegaonमालेगांवHome Ministryगृह मंत्रालय