शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

राज्यातील बंद साखर कारखाने घेता का कोणी....़?

By admin | Published: December 13, 2014 12:39 AM

राज्य बॅँकेची गोची : लिलावास सहावेळा प्रतिसादच नाही; कारखान्यांकडे अडकले कोट्यवधी रुपये

राजाराम लोंढे - कोल्हापूर --कोट्यवधी रुपयांची देणी अडकल्याने राज्य बॅँकेने विविध सहकारी साखर कारखाने व सूतगिरण्यांची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात सहा-सहा वेळा लिलावाची प्रक्रिया राबवूनही कारखाना घेण्यास कोणी पुढे येत नसल्याने राज्य सहकारी बॅँकेसमोर पेच निर्माण झाला आहे. अवाढव्य काढलेले कर्ज व वारेमाप केलेल्या खर्चामुळे राज्यातील साखर कारखाने व सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. प्रामुख्याने मराठवाड्यातील अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. राज्य बॅँकेचे कोट्यवधी रुपये या कारखान्यांकडे अडकले आहेत. ‘रिकन्स्ट्रक्शन आॅफ फिनान्शिअल अ‍ॅसेट्स अ‍ॅँड एन्फोर्समेंट आॅफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अ‍ॅक्ट २००२’ अनुसार बॅँकेने हे कारखाने लिलावास काढले आहेत. गेले वर्षभर लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे; पण प्रतिसाद मिळत नसल्याने राज्य बॅँकेची गोची झाली आहे. कारखान्यावरील अवाढव्य कर्ज व मालमत्ता यांची सांगड बसत नाही. काही कारखान्यांच्या बाबतीत सांगड बसली तर इतर अडचणी असल्याने कारखाना घेण्यास फारसे कोणी उत्सुक नाही. उसाचे क्षेत्र फारच कमी असते. ते क्षेत्र असूनही कारखाना चालविण्यास घेतल्यास सभासद व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल याची खात्री नसल्याने कारखाने घेण्याचे कोणी धाडस करीत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्य बॅँकेवर ‘कारखाने घेता का कोणी कारखाने...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही कारखान्यांची टेंडर प्रक्रिया चार ते सहा वेळा राबविली आहे. विहित वेळेत प्रतिसाद मिळत नाही. टेंडर भरण्याची वेळ गेल्यानंतर काहीजण येतात. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. - प्रमोद कर्नाड (व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बॅँक) कारखान्यांवरील कर्जेकारखाने/सूतगिरणीचे नावराज्य बॅँकेचे देणे एकूण देणे जिजामाता साखर, दुसरबीड, बुलढाणा३४ कोटी ४ लाख६४ कोटी ३० लाख डॉ. वि. वि. पाटील साखर, ४७ कोटी ५६ लाख६३ कोटी ९६ लाख, अशोकनगर, बीडसहभाग-७० कोटी ९३ लाखकडा साखर, आष्टी, बीड२७ कोटी २ लाख२६ कोटी ९९ लाखदेवगिरी साखर, फुलंब्री, औरंगाबाद७६ कोटी ९४ लाख२७ कोटी २५ लाखपांझराकान साखर, साक्री, धुळे२८ कोटी ९५ लाख६३ कोटी २० लाखबापूरावजी, हिंगणघाट, वर्धा३४ कोटी ५८ लाख९३ कोटी ६७ लाखसहभाग-२७ कोटी ५८ लाखसंतनाथ साखर, वैराग, सोलापूर३४ कोटी ८४ लाख२६ कोटी १४ लाखमाउली सूतगिरणी, गेवराई, बीड६ कोटी ४५ लाख३१ कोटी ३८ लाखशारदा यंत्रमाग विणकर, कुंभारी, सोलापूर१५ कोटी ३२ लाख२० कोटी २६ लाखअकोट तालुका सूतगिरणी, अकोला१२ कोटी ५६ लाख९२ कोटी ४९ लाखताकही फुंकून पिण्याची वेळतीन-चार वर्षांपूर्वी राजकीय नेत्यांच्या ताब्यात राज्य बॅँक असताना बंद कारखाने घेण्यासाठी साखरसम्राटांच्या उड्या पडत होत्या; पण बॅँकेवर प्रशासक आहे. त्यातच तासगाव कारखान्याचे प्रकरण ताजे असल्याने बॅँकही ताकसुद्धा फुंकून पीत आहे. त्यामुळेच प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. प्रतिसाद न मिळण्याचीकारणेगाळपास अपेक्षित अनुपलब्धतामालमत्ता व देय रकमेची सांगड सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबाबत साशंकताबॅँकेच्या देण्यांशिवाय अडचणी