पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला वाली कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 03:56 AM2019-03-21T03:56:07+5:302019-03-21T03:56:37+5:30
सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली, अधिसूचनाही निघू लागल्या; मात्र पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी असली तरी मिळालेल्या तीन जागा लढविण्यासही उमेदवार मिळेना झाले आहेत.
- वसंत भोसले
कोल्हापूर - सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली, अधिसूचनाही निघू लागल्या; मात्र पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी असली तरी मिळालेल्या तीन जागा लढविण्यासही उमेदवार मिळेना झाले आहेत. एकेकाळच्या बालेकिल्ल्यात कॉँग्रेसला कोणी वालीच नाही, अशी अवस्था झाली आहे.
पुणे, सांगली आणि सोलापूर च्या जागा काँग्रेस पक्षाकडे जाणार आहेत. यापैकी सोलापूरमधूनज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे. पुढील आठवड्यात अधिसूचना निघणार असताना पुणे आणि सांगलीतून उमेदवार कोण असणार, याचा निर्णयच होत नाही. कोणी उभे राहण्यास तयार नाही. दरम्यान, हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना दोन्ही काँग्रेसनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सांगलीची जागाही स्वाभिमानी शेतकरी संघटना मागत आहे. तसे झाले तर पश्चिम महाराष्ट्रात काग्ँॅ ास्े्र ाकडे के वळ सोलापूर आणि पुण्याचीच जागा राहणार, हे स्पष्ट दिसते हे.
भाजपाने पुणे, सांगली, माढा, सोलापूर आणि बारामतीचे मतदारसंघ घेतले आहेत. मात्र, त्यांचे उमेदवार ठरत नाहीत. शिवसेनेने कोल्हापूर, सातारा, हातकणंगले, शिरूर, मावळ या जागा युतीमध्ये वाटून घेतल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीकडे त्यांचे अधिक लक्ष असल्याने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
काँग्रेस आघाडीने अंतर्गत नाराजी लपवण्यासाठी तलवार म्यान केली असल्याचे चित्र पश्चिम महाराष्ट्रात तयार झाले आहे. पुण्यात खासदार संजय काकडे यांना जवळ करण्याचा प्रयत्न, तर सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडण्याची तयारी
अशी केविलवाणी अवस्था झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र विद्यमान तीन खासदार (उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे आणि धनंजय महाडिक) यांना उमेदवारी देऊन टाकली आहे. शिवाय मावळमधून पार्थ पवार आणि शिरूरमध्ये अभिनेते डॉ. अमोल
कोल्हे यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे. या पाश्वभर्् ाम्ू ाीवर काग्ँ ास्े्र ाची कोणतीही तयारी
नाही, त्यामळु े यत्े या निवडणकु ीत तरी काग्ँ ास्े्र ा भोपळा फोडणार की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
प.महाराष्ट्रात एकही खासदार नाही!
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या दहा जागा आहेत. यापकै ी एकही खासदार काग्ँॅ ास्े्र ाचा नाही. राष्ट्रवादी काग्ँॅ ास्े्र ाच े चार, तर भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन खासदार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडे एक
जागा आहे. यावळे ी काग्ँॅ ास्े्र ाची राष्ट्रवादीशी आघाडी आहे, तर भाजपची शिवसेनेशी युती आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युतीशी फारकत घऊे न काग्ँॅ ास्े्र ा आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी झाली, पण एकी कुठाय?
राष्ट्रवादी काग्ँॅ ास््र ान े कोल्हापरू , बारामती, शिरुर, मावळ आणि साताऱ्याचे उमेदवार
जाहीर करून आघाडी घेतली आहे. माढ्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी न
लढण्याचा निर्णय घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, मोहिते-पाटील घराण्याने भाजपला जवळ केल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत
भर पडली आहे. सातारा आणि कोल्हापुरात राष्ट्रवादी काग्ँॅ ास्े्र ाला मदत करण्याच्या भूि मके त काग्ँॅ ास्े्र ाच े अनके नत्े ा े तयारीत नाहीत. काग्ँॅ ास्े्र ा आघाडीला अडचण निर्माण करून भाजपशि वसेनेचा मार्गही सोपा करण्याची भूमिका वटवित आहेत. याकडे कोणाही नेत्याचे लक्ष नाही