नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी द्यायला लावला? पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवले 'बोट'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:38 AM2023-03-28T11:38:31+5:302023-03-28T11:39:16+5:30
पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे.
महाविकास आघाडीत जाण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आग्रही होते. शिवसेनेसोबत जाण्यास विरोध करतील असे वाटले होते. परंतू तेच महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत होते, यावर देखील पृथ्वीराज यांनी खुलासा केला आहे. २०१४ मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतू आम्ही तेव्हा विचार केला नव्हता. मग २०१९ ला का केला? याचे उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीतील निर्णय प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त केली आहे.
अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका
पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. २०१४ मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतू आम्ही तेव्हा विचार केला नव्हता. मग आम्ही २०१९ ला का केला? याचे कारण ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे भाजपचे सरकार चालविले आणि भाजपाने विरोधकांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केला, देशात विरोधी पक्ष संपवून टाका, असे वक्तव्य अमित शहांकडून झाले त्यामुळे हा विचार केला. अल्पसंख्यांक नेत्यांनीही आम्हाला महाविकास आघाडीत जाण्यास सांगितले. य़ामुळे मी पुढाकार घेतला. दिल्लीत सोनिया गांधींचे मन वळविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. काही घटना घडल्या त्यामुळे सरकार पडले, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.
राज्यातील सरकार प़डले त्यात आमचीही काही चूक होती. काही गोष्टी घडायला नको होत्या. अध्यक्षपद खूप महत्वाचे होते. त्यामुळे आमच्यातल्यांचा गोंधळ काही बरोबर नव्हता, असे म्हटले. यावर नाना पटोलेंनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले गेले, या मुद्द्यावर छेडले असता यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले.
नाना पटोलेंना राजीनामा का द्यायला लावला, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना राजीनामा प्रदेशाध्यक्षपदासाठी द्यायला लावला हे स्पष्ट होते. त्यांना कोणी द्यायला लावला, या राजकारणावर मला बोलता येणार नाही, परंतू यामुळे दोन्ही मित्रपक्ष दुखावले गेले. इतक्या मोठ्या पदावर निर्णय घेताना सर्वांनी मिळून निर्णय घ्यायला हवा होता. एकतर्फी निर्णय घेता नये. त्यामुळे पुढचे राजकारण घ़डले, असे चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला नको होता. मी स्पष्ट बोललो होतो. त्यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जायला हवे होते. मी त्या प्रक्रियेमध्ये होतो, परंतू मला कोणी विचारले नाही, यामुळे सल्ला देण्याचा प्रश्न आला नाही. आता जे घडले तो इतिहास झालाय, पुढच्या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र लढवाव्यात. जागा वाटपात कुरबुरी होईल, परंतू महाराष्ट्राच्या हितासाठी विषारी विचारांच्या प्रवृत्तीला दूर ठेवले पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र येऊ, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.