शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

एकनाथ शिंदे यांची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत? पक्षाकडून मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 4:18 PM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे शिंदेंना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, पक्षाने शिंदेंना गटनेते पदावरुन हटवून, त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड केली आहे. त्यांच्या निवडीनंतर अजय चौधरी कोण आहेत, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.कोण आहेत अजय चौधरी?अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. 2019 मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून चौधरी विजयी झाले होते. त्यांची आमदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. अजय चौधरी हे फार मोठं नाव नाही, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ठाकरे कुटुंब पक्षाची दोरी आपल्या हातात ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या पक्षापुढे या अटी...एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, अशी अट शिंदे यांनी ठेवल्याचे बोलला जात आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे