मुंबई: भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी अनिक्षा नावाच्या डिझायनरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर अमृता यांनी ही ऑफर स्वीकारली नाही, त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलही करण्यात आले. अमृता त्या महिला डिझायनरला फार पूर्वीपासून ओळखतात. ती त्यांच्या घरीही अनेकदा आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिक्षा आणि तिचा भाऊ अक्षन जयसिंघानी यांना ताब्यात घेतले आहे. जाणून घेऊया कोण आहे अनिक्षा आणि काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
कोण आहे अनिक्षा?अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिक्षावर महाराष्ट्र, गोवा आणि आसाममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. अनिक्षा ही कायद्याची पदवीधर आहे. ती उल्हासनगरची रहिवासी असून, स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा बऱ्याच दिवसांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे.
काय प्रकरण आहे?
2021 मध्ये अनिक्षाला भेटल्याचे अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे. अनिक्षाने अमृता यांना सांगितले होते की तिला आई नाही. तिने स्वतःची डिझायनर म्हणून ओळख करुन दिली होती. तिने अमृता यांना सार्वजनिक कार्यक्रमात आपले कपडे आणि दागिने घालायला सांगितले. अमृता यांनी अनिक्षाला होकार दिला. अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी आपल्याला धमकावून आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध आयपीसीच्या कलम 120-बी (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता यांनी मलबार हिल स्टेशनवर 20 फेब्रुवारी रोजी हा एफआयआर दाखल केला होता.
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत माहिती दिलीदुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. पत्नीला लाच देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. डिझायनरने अमृताला धमकी दिली होती की, तिच्या फरार वडिलांवरील खटले मागे न घेतल्यास ती अमृताला अडचणीत आणले, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच, याबाबत योग्य ती चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.