शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:08 IST

Devendra Fadnavis Office vandalized Update: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनात एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तोडफोड करणाऱ्या या महिलेबाबत आता तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनात एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनासमोर लावलेली नेमप्लेट तोडल्याचे तसेच तिथे ठेवलेल्या कुंड्यांची मोडतोड केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शेध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तोडफोड करणाऱ्या या महिलेबाबत आता तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे असल्याचं समोर आलं आहे. तसेच ती मुंबईमधील एका उच्चभू सोसायटीमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेने  पास न काढता सचिव गेटने मंत्रालयात प्रवेश केला होता. तसेच तिथे जात देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरील नेमप्लेट आणि कुंड्यांची तोडफोड केली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा तिथे सुरक्षेसाठी केवळ पुरुष पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे या महिलेला रोखता आले नव्हते. त्यानंतर काल रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी तपास करत या महिलेला शोध घेतला. तपासामध्ये आरोपी धनश्री सहस्रबुद्धे ही महिला मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचे समोर आले. तसेच ही महिला ज्या सोसायटीमध्ये राहते तिथल्या चेअरमननींही सदर महिला उच्चशिक्षित असून, मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने मागच्या दहा महिन्यांपासू सोसायटीमधील लोकांना त्रास देत असल्याचे सांगितले.

दरम्यान, धनश्री सहस्रबुद्धे या महिलेचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. मात्र सदर महिला ही पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. तिने घराचे दरवाजे बंद करून स्वत:ला आत कोंडून घेतलं आहे. त्यामुळे पोलिसांनी आता तिच्या मुंबईबाहेर असलेल्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मुंबईत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :Mantralayaमंत्रालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई