"बालवाडीतील मुलं सुद्धा सांगतील; हा जॉनी कोण?", शरद पवार गटाचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 01:05 PM2024-02-13T13:05:39+5:302024-02-13T13:16:12+5:30
Mahrashtra Politics : अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याने विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका करत आहेत.
Mahrashtra Politics, Ashok Chavan Join BJP ( Marathi News) मुंबई : माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणभाजपामध्ये जाणार आहेत. आज दुपारीच भाजपाच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान, आदर्श घोटाळ्याचे आरोप असलेले अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याने विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही खोचक ट्विट करत भाजपाला टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरुन खोचक कविता ट्विट करत अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावरुन निशाणा साधला आहे. " Johneyy Johnny Yes Papa? Eatingh Khoke ? No papa! Leaving Party? No papa! Afraid of ED? No Papa! Telling Lies? No papa! Open your mouth !!! भा..ज.. पा.." असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लगावला आहे. तसेच, बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..!, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.
बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! pic.twitter.com/TAHYuF1MQS
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 13, 2024
दरम्यान, अशोक चव्हाण यांचा आजच भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशापूर्वी अशोक चव्हाण म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश होतोय. माझ्या नव्या राजकीय आयुष्याची ही सुरुवात आहे. मी कुणालाही निमंत्रित केले नाही. मी कुठल्याही कामासाठी घरातून निघताना पूजा करतो. हे नित्यनियम आहे. काँग्रेसचा विषय संपला आहे. आता नवीन सुरुवात होत आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाणांची कारकीर्द
काँग्रेसचे महाराष्ट्रातील दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री, दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी धक्कादायक निर्णय घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. १९८२ मध्ये अशोक चव्हाणांनी सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ते काम करत होते. १९८७ च्या नांदेड पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. शरद पवारांच्या सरकारमध्ये ते राज्यात राज्यमंत्री म्हणून काम करत होते. २००८ आणि २००९ या काळात दोनदा अशोक चव्हाणांवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१४ मध्ये मोदी लाटेतही नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण निवडून आले होते.