शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

‘महाराष्ट्राचा प्रभावी राजकारणी कोण?’

By admin | Published: March 21, 2016 3:46 AM

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६’ या पुरस्काराच्या निमित्ताने या वर्षी प्रथमच दोन आगळेवेगळे विभाग तयार करण्यात आले आहेत. कोणाकडून आहेत अपेक्षा? आणि प्रभावी राजकारणी कोण?

मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६’ या पुरस्काराच्या निमित्ताने या वर्षी प्रथमच दोन आगळेवेगळे विभाग तयार करण्यात आले आहेत. कोणाकडून आहेत अपेक्षा? आणि प्रभावी राजकारणी कोण? अशा या दोन विभागांत दोन मान्यवरांची निवड ही राज्याच्या राजकीय इतिहासात चर्चेचा विषय बनेल; आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रासाठी ती मोठी उपलब्धी असेल.अनेक नेते राजकीय पटलावर येतात. त्यातील अनेक आपली प्रभावी छाप पाडतात. असे अनेक नेते आहेत ज्यांना छोट्यातल्या छोट्या गावातला कार्यकर्ता नावानिशी माहिती असतो. त्यामागे त्यांची अनेक वर्षांपासूनची मेहनत असते. राज्याचा उभा-आडवा भूगोल आणि गावोगावचे राजकारण, बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखण्याची ताकद असणारे प्रभावी नेते म्हणूनच प्रत्येकाला भावतात, आवडतात. लोक अनेकदा अशा नेत्यांच्या वागण्या-बोलण्याचे अनुकरणही करू लागतात. काही नेते काम भरपूर करतात, पण प्रभाव लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. असे म्हणतात की, ‘ये पब्लिक है, सब जानती है’ राजकारण्यांना दूषणे देणे, प्रस्थापितांच्या विरोधात बोलत राहणे, त्यासाठी सोशल मीडियाचा बिनदिक्कत वापर करणे ही स्टाईल झाली असली तरी प्रत्येकाला मनातून कुठेना कुठे नेत्यांचा प्रभाव जाणवत असतो. महाराष्ट्राच्या जनमनावर आणि या राज्याच्या विकासावर सर्वांत प्रभावी छाप टाकणारा नेता कोण, हा प्रश्न कायम प्रत्येकाच्या चर्चेत असतो. त्याचेच उत्तर तुमच्या मतांतून आणि ज्यूरीच्या कौलातून महाराष्ट्राला मिळणार आहे. 

(सर्व नामांकनांचा क्रम इंग्रजी आद्याक्षरानुसार)प्रभावी राजकारणी कोण? (नामांकने) १) अजित पवार - राष्ट्रवादी - प. महाराष्ट्र२) अशोक चव्हाण - काँग्रेस - मराठवाडा३) एकनाथ खडसे - भाजपा - खानदेश४) गुरुदास कामत - काँग्रेस - मुंबई५) जयंत पाटील - राष्ट्रवादी - प. महाराष्ट्र६) नितीन गडकरी - भाजपा - विदर्भ७) पीयूष गोयल - भाजपा - मुंबई८) पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस - पश्चिम महाराष्ट्र९) राज ठाकरे - मनसे - मुंबई१०) उद्धव ठाकरे - शिवसेना - मुंबई

>> आॅनलाइन मतदान असे करता येईल!नामांकने www.lokmat.com   येथे जाहीर करण्यात आली आहेत. आपण या साईटवर जा. तेथे ‘व्होट नाऊ’ असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर मतदानासाठी सगळी नामांकने येतील. विविध विभागासाठीच्या नामांकनांची यादी आपल्याला तेथे दिसेल. फोटोंवर क्लिक केल्यास त्या व्यक्तीविषयीची माहिती येईल आणि आपल्याला ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्यांच्या नावावर क्लिक केल्यास आपले मत त्या व्यक्तीस मिळेल. एका विभागात एकाच व्यक्तीला मतदान करता येईल. सगळ्यात शेवटी ‘कन्फर्म व्होट’ असे लिहिलेले आहे. त्यावर क्लिक केल्यास आपली मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. आपण कोणत्या विभागासाठी कोणाला मतदान केले आहे त्याची यादी त्यानंतर लगेच आपल्याला दिसेल. तर चला, आॅनलाइनला भेट द्या आणि निवडा आपले विजेते..!