चंद्रकांत की हर्षवर्धन पाटील? : वेबसाईटवर दोघांचाही उल्लेखपुणे : महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सहाजिकच प्रत्येक खात्याला नवीन मंत्री लाभले. असे असले तरी, सहकारसारख्या महत्वाच्या खात्याच्या लेखी मात्र आपले मंत्री नेमके कोण, हे अद्याप निश्चित झालेले नसावे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग खात्याच्या वेबसाईटवर एका ठिकाणी चंद्रकांत पाटील तर दुसऱ्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.१५ वर्र्षेे सत्तेत असलेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पराभूत होऊन राज्यात सत्तांतर घडले. मात्र, ही गोष्ट सरकारमधील महत्वाचे खाते असलेल्या सहकार विभागाला माहित नसावी. सरकार स्थापनेला सुमारे २ महिने उलटूनही या खात्याच्या वेबसाईटवर हर्षवर्धन पाटील यांच्याकडेच सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग खात्याचा कार्यभार असल्याचा उल्लेख आहे. सुरेश धस वरील खात्याचे राज्यमंत्री असल्याचेही या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे. या विभागाचे सचिवही अलीकडेच बदलले आहेत.सहकार सचिवपदी चंद्रकांत दळवी यांची नियुक्ती झालेली आहे. आजच (मंगळवार, दि. ६) त्यांनी पदभार स्वीकारला. मात्र वेबसाइटवर त्याचा उल्लेख नाही. सरकारी विभागाच्या कारभाराची गती लक्षात घेता हे एकवेळ समजण्यासारखे आहे. मात्र, सरकार स्थापन होऊन २ महिने उलटल्यानंतरही सहकार विभागाला वेबसाईट अद्ययावत करण्यासाठी वेळ मिळू शकलेला नाही.याबाबत माहिती घेण्यासाठी पुण्यातील सहकार खात्याच्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केला असता डेप्युटी रजिस्ट्रार संजीव कुलगोड यांच्याकडे वेबसाईटची जबाबदारी असून त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. वारंवार प्रयत्न करूनही कुलगोड यांचा फोन प्रत्येक वेळी नॉट रिचेबल होता. त्यामुळे सहकार खात्याचे यावरील मत कळू शकले नाही. (प्रतिनिधी)४ सहकार विभागाच्या ँ३३स्र२://ेंँं२ंँं‘ं१.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल बेबसाईटवर या खात्यासाठी दोन कॅ बिनेट मंत्री (त्यातही एक आजी आणि एक माजी) आहेत. या साईटवर गेल्यानंतर ‘आमच्याविषयी’ या विभागातील ‘मान्यवर’ या उपविभागावर क्लिक केल्यावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, तर चंद्रकांत पाटील खात्याचे मंत्री असल्याचे नमूद केलेले दिसते. याच वेबसाईटवर ‘सं पर्क’ विभागामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्याकडे हे खाते असल्याचे दिसते.
राज्याचे सहकारमंत्री नेमके कोण?
By admin | Published: January 07, 2015 1:52 AM