कोणाचे काय चुकले होते, जे तुम्ही नवे सरकार स्थापन केले? अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:03 PM2023-06-16T12:03:36+5:302023-06-16T12:04:03+5:30

धुळे नंदुरबार जिल्ह्यातून आपला एकही आमदार नाही, असे चालणार नाही.

Who was wrong, that you formed a new government? Ajit Pawar's question to Eknath Shinde | कोणाचे काय चुकले होते, जे तुम्ही नवे सरकार स्थापन केले? अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल 

कोणाचे काय चुकले होते, जे तुम्ही नवे सरकार स्थापन केले? अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल 

googlenewsNext

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाल्याने अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

जातीय दंगली घडवून पुरोगामी महाराष्ट्रात धर्मांधर्मात पसरविणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे केले. दोंडाईचा शहरातील केशरानंद नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. भाजप जातीय दंगली घडवून महागाई, बेरोजगारी, विकासाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोपदेखील यावेळी त्यांनी केला.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार एक वर्षांपूर्वी गद्दारी करून आणण्यात आले. त्यात पन्नास खोके एकदम ओके. महाराष्ट्राला याच्या आधी ५० कोटी माहिती नव्हते ते कोणी माहिती करून दिले? तर या गद्दारांनी करून दिले. धुळे नंदुरबार जिल्ह्यातून आपला एकही आमदार नाही, असे चालणार नाही. दोन्ही जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार मिळाले पाहिजे. पुन्हा एकदा हे उलट्या पायाचे सरकार आपल्याला बाजूला करायचे आहे, असे पवार म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकारचा दोन वर्ष कार्यकाळ सुरळीत झाला असताना शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांनासोबत घेऊन बंड केले. भाजपच्या मदतीने त्यांनी बंड करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणले. यावर पवार यांनी टीका केली. सरकार व्यवस्थित चालू असताना असे का केले? कोणाचे काय चुकले असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला. शिंदे मुंबईतून सुरतला गेले. सुरतवरून गुवाहाची, तिथून गोव्याला आले. परत मुंबईला आले, अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघाला मग अशा पद्धतीने असे काय घडले होते, कुणाचे काय चुकले होते. अचानक नवीन सरकार का स्थापन करावे लागले, असा सवाल अजित पवारांनी केला.

Web Title: Who was wrong, that you formed a new government? Ajit Pawar's question to Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.