शहरं
Join us  
Trending Stories
1
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
2
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
3
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
4
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
5
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
6
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
7
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
9
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
10
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
11
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
12
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
13
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
14
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
15
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
16
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
18
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
19
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
20
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 5:59 PM

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल असे म्हणत राज यांनी 'त्या' नेत्याचे थेट नावही सांगितले आहे. एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याचबरोबर, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? यावरही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल, असे म्हणत राज यांनी 'त्या' नेत्याचे थेट नावही सांगितले आहे. एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ते एबीपी न्यूज हिंदीसोबत मुलाखतीदरम्यान बोलत होते. 

यावेळी, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मला वाटते, पुढचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल. यावर पुन्हा विचारण्यात आले की, आपल्याला असे का वाटते? यावर राज म्हणाले "वाटते तर वाटते." राज ठाकरे पुढे म्हणाले, "जेव्हा 2029 मध्ये आपण मला हा प्रश्न विचाराल की, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? तेव्हा मी सांगेन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण लिहून ठेवा. 

यानंतर, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? याचे उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "देवेंद्रजी (देवेंद्र फडणवीस) होतील." यावर, देवेंद्रजी होऊ शकतात पुढचे मुख्यमंत्री? आपल्याला असे वाटते? असे विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, "बिलकूल होऊ शकतात".    

...तर माझ्याकडेही धैर्य आहे -यावेळी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे उदाहरण देत, "जर भाजप 1952 पासून ते 2014 पर्यंत थांबू शकते. शिवसेनाची स्थापना 1966 मध्ये झाली आणि 1995 मध्ये सत्तेत आली, तर माझ्याकडेही धैर्य आहे," असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूक 2024Chief Ministerमुख्यमंत्री