शरद पवारांची निवृत्ती; आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? ४ नेत्यांची नावे आघाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 05:46 PM2023-05-02T17:46:20+5:302023-05-02T17:49:31+5:30

NCP Sharad Pawar Big Decision: राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

who will be the next president of ncp after sharad pawar retirement decision discussion on these four leaders name | शरद पवारांची निवृत्ती; आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? ४ नेत्यांची नावे आघाडीवर!

शरद पवारांची निवृत्ती; आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? ४ नेत्यांची नावे आघाडीवर!

googlenewsNext

NCP Sharad Pawar Big Decision: राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवारांनी त्यांच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होतानाच आता पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. त्यावेळी शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला. 

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. यातच राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहेत. शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवारांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीतील सर्वांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केला. ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना अश्रू अनावर झाले होते. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर नवीन समिती गठीण करण्यात येणार आहे. या समितीत कोण सदस्य असतील, याबाबतची नावे शरद पवार यांनी सूचवली आहेत.

नवीन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी समिती

नवीन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गठीत करण्यात येणाऱ्या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य नेत्यांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे.

कोणत्या ४ नेत्यांची नावे आघाडीवर?

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यान चार नावं घेतली जात आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल या चौघांच्या नावाची चर्चा होत आहे.

दरम्यान, तुम्ही एक गैरसमज करुन घेत आहात की पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असा भाग नाही. शरद पवारांच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतो आहोत. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचे काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत. आता पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेब लोकशाहीत जनतेचे ऐकत असतात हे मी कित्येक वर्षे पाहिलेले आहे. साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्या जो पार्टीचा अध्यक्ष होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: who will be the next president of ncp after sharad pawar retirement decision discussion on these four leaders name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.