पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट घेऊन आली आहे ‘रायसोनी नटसम्राट’ एकपात्री स्पर्धा. रायसोनी ग्रुपच्या सहकार्याने ही स्पर्धा येत्या १६ तारखेला होणार आहे.प्रत्येक मुला-मुलींत चांगले कलागुण असतात. करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते. त्यामुळे मुलांना स्वत:मधील कलागुण ओळखून त्या आधारे करिअरची निवड केल्यास आवडीच्या क्षेत्रात भविष्यात यश मिळविणे शक्य होते.युवा नेक्स्टच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचे मनोरंजन हाच केवळ उद्देश नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे हासुद्धा आयोजनामागील उद्देश असतो.‘लोकमत’च्या या विविध उपक्रमांतर्गतच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘रायसोनी नटसम्राट’ या एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तीन मिनिटे देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या नाटकातील एक प्रवेश या वेळी सादर करायचा आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रायसोनी नटसम्राट’ या उपाधीने गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अनेकविध पारितोषिक देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
पुण्यातून कोण होणार ‘रायसोनी नटसम्राट’
By admin | Published: March 10, 2016 1:05 AM