शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

असाह्य महिलांची हाक ऐकणार कोण?

By admin | Published: November 25, 2015 4:07 AM

संकटात सापडलेल्या महिलांच्या हाकेला धावून जाण्यासाठी पोलीस खात्याने हेल्पलाइन सुरू केली खरी; परंतु या दूरध्वनी सुविधेवर साह्य मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

मुंबई : संकटात सापडलेल्या महिलांच्या हाकेला धावून जाण्यासाठी पोलीस खात्याने हेल्पलाइन सुरू केली खरी; परंतु या दूरध्वनी सुविधेवर साह्य मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आता कुणाकडे मदतीचा हात मागावा, असा प्रश्न महिलांना पडला आहे. ‘लोकमत’ने राज्यभरात केलेल्या स्टिंगमधून हे वास्तव समोर आले आहे.२५ नोव्हेंबर हा जागतिक महिला अत्याचारविरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त लोकमतने जिल्ह्णा- जिल्ह्णात स्टिंग आॅपरेशन केले. त्याअंतर्गत महिलांच्या साहाय्यासाठी शासनाने सुरू केलेल्या १०३ आणि १०९१ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क करून ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार नोंदविली आणि त्यावर पोलिसांच्या प्रतिसादाची नोंद केली. मुंबईसारख्या महानगरात १०३ या महिला साहाय्यता क्रमांकावर संपर्क करून मदत मागणाऱ्या लोकमतच्या प्रतिनिधीला हद्दीची कारणे दाखवून मदत नाकारण्यात आली. तसेच साताऱ्यात एका महिलेवर अत्याचार होत असल्याची माहिती सांगण्यासाठी संपर्क केला असता, तिथेही अन्य ठिकाणी संपर्क करायला सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सिंधुदुर्गातसुद्धा तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याऐवजी अन्य पोलीस अधिकाऱ्याचा क्रमांक देऊन तेथे संपर्क करण्यास सांगण्यात आले. लातूरमध्ये अनेक वेळा हेल्पलाइनवर कॉल करूनसुद्धा फोन उचलण्यात आला नाही. तर हिंगोली, गोंदिया जिल्हह्णांत महिला साहाय्यता क्रमांक सुरूच नसल्याचे आढळले. (लोकमत न्यूज नेटवर्क)महिलांसाठी उपलब्ध असलेल्या या क्रमांकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यातही शासन यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून आले.शाळा-महाविद्यालयांतील तरुणी तसेच महिलांना हेल्पलाइनबद्दल माहितीच नसल्याचे उघडकीस आले. मुंबईवगळता अन्य ठिकाणी या क्रमांकांवर मदतीसाठी येणाऱ्या कॉलच्या संख्येवरूनही ते सिद्ध झाले. मुंबईत हेल्पलाइनवर महिन्याकाठी १५ ते १६ हजार कॉल येतात. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ महिन्यांत या क्रमांकावर केवळ ११ तक्रारी, जालन्यात गेल्या वर्षभरात केवळ ८ तक्रारी, नांदेडमध्ये दरमहा १० ते १२ तक्रारी, सोलापूरमध्ये ११ महिन्यांत ७४ तक्रारी, तर वर्ध्यात वर्षभरात केवळ ८ तक्रारी या क्रमांकावर नोंदविण्यात आल्या.