मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी चीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ंअनेक आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तसेच, काही अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली. आधीच्या दोन विदेश दौऱ्यांना रवाना होण्यापूर्वी त्यांनी अनुक्रमे आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. पुढील अधिकाऱ्यांना उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून पदोन्नती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.पोलीस उपायुक्त (वाहतूक;मुंबई) पी. आर. दिघावकर हे आता मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असतील. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असलेले एम. एस. लोहिया यांना मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नेमण्यात आले आहे. अन्य बदल्या अशा (कंसात आधीचे पद) - कृष्णप्रकाश - डीआयजी, सीआयडी गुन्हे; पुणे (अतिरिक्त आयुक्त मुंबई), एफ.के.पाटील- अतिरिक्त आयुक्त; मुंबई (अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई), व्ही.आर.चव्हाण - अतिरिक्त आयुक्त; नवी मुंबई (अतिरिक्त आयुक्त; मुंबई), कैसर खलिद - अतिरिक्त आयुक्त; मुंबई (अतिरिक्त आयुक्त; वाहतूक मुंबई), किशोर जाधव - अतिरिक्त आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अतिरिक्त आयुक्त; मुंबई), चेरिंग दोरजी - अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग मुंबई (अतिरिक्त आयुक्त पूर्व विभाग), व्ही.एन.जाधव - अतिरिक्त आयुक्त; मुंबई (डीआयजी राज्य सुरक्षा महामंडळ). के.जी.पाटील - डीसीपी ठाणे (डीसीपी मुख्यालय, मुंबई), एम.के.भोसले -डीसीपी; एसआयडी पुणे (डीसीपी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे), एस.आर.दिघावकर - एसआरपीएफ; नवी मुंबई (जिल्हा अधीक्षक बुलडाणा), शारदा राऊत - जिल्हा अधीक्षक पालघर (डीसीपी मुख्यालय, मुंबई), डी.आर.सावंत - डीसीपी; मुंबई (जिल्हा अधीक्षक, सांगली), एस.डी.एनपुरे - कमांडंट एसआरपीएफ जालना (डीसीपी; एसबी, नवी मुंबई), राजीव जैन - एसीबीचे अधीक्षक; नागपूर (जिल्हा अधीक्षक, चंद्रपूर), आर.एस.माने - उपायुक्त; एसआयडी पुणे (डीसीपी झोन ३, पुणे), व्ही.बी.देशमुख - उपायुक्त नाशिक (उपायुक्त; मुंबई शहर), महेश पाटील - उपायुक्त एसआयडी मुंबई (उपायुक्त झोन ५, मुंबई), पी.बी.सावंत - उपायुक्त; मुंबई (पोलीस अधीक्षक एटीएस, मुंबई), एस.एम.वाघमारे - उपायुक्त मुंबई (उपायुक्त, नागपूर), एस.व्ही.शिंत्रे - कमांडंट एसआरपीएफ दौंड (उपायुक्त एसबी १, मुंबई), सुनील भारद्वाज - एसपी पीसीआर नांदेड (डेप्युटी कमांडंट एसआयडी, मुंबई), शिला सैल - उपायुक्त मुंबई(अधीक्षक; एसआयडी मुंबई), एस.एस.बुरसे - उपायुक्त मुंबई (उपायुक्त सोलापूर), बी.के.राजपूत - उपायुक्त सोलापूर (उपायुक्त मुंबई), बी.यू.भांगे - उपायुक्त एसआयडी मुंबई (अतिरिक्त अधीक्षक उस्मानाबाद), राहुल श्रीरामे - उपायुक्त नवी मुंबई (अतिरिक्त अधीक्षक अहेरी), प्रवीण पवार - उपायुक्त मुंबई (अधीक्षक एसीबी नाशिक), मोहम्मद सुवेज हक - जिल्हा अधीक्षक रायगड (अधीक्षक पालघर), एस.एच.महावरकर - उपायुक्त एसआयडी मुंबई (अधीक्षक रायगड), डी.टी.शिंदे - जिल्हा अधीक्षक सिंधुदुर्ग (अधीक्षक फोर्स वन मुंबई), एस.एच.पाटील - जिल्हा अधीक्षक धुळे (उपायुक्त एसआयडी मुंबई), अनिल कुंभार - उपायुक्त मुंबई (अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण), महेश घुरे - जिल्हा अधीक्षक नंदुरबार (उपायुक्त एसआयडी मुंबई), एम.रामकुमार - उपायुक्त मुंबई (अधीक्षक नंदुरबार), विक्रम देशमाने - उपायुक्त मुंबई (अधीक्षक सीआयडी पुणे), अंकुश शिंदे - उपायुक्त मुंबई (कमांडंट एसआरपीएफ मुंबई). (विशेष प्रतिनिधी)
पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘घाऊक’ बदल्या
By admin | Published: May 14, 2015 1:52 AM