सर्वाचेच लक्ष : 2014ची निवडणूक ठरणार अपवादराज्य
विधानसभेसाठी बुधवारी 64 टक्के मतदान झाले. आतार्पयतचा इतिहास पाहता 6क् ते 65 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले तेव्हा सत्तेवर कोण येणार हे, निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झालेले होते. निकालानंतर केवळ ती औपचारिकता राहिली होती.
एकदा मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले आणि त्यावेळी राज्यात सत्ताबदल झाला. परंतु यावेळची स्थिती काहीशी वेगळी आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा सत्तांतराची
चिन्हे दिसत होती.
मात्र शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वेगळ्य़ा चुली मांडल्याने वारे कोणाच्या बाजुने आहेत, याचे ठोकताळे बांधणो अवघड झाले आहे. त्यात मतदानाची टक्केवारीही तेवढीच आहे. त्यामुळे रविवारच्या निकालाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.