शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

मतांचा ‘सागर’ कुणासोबत?

By admin | Published: June 10, 2014 1:08 AM

पश्‍चिममध्ये अशा स्थितीत सुधाकर देशमुखांसारखीच स्थिती मुळकांचीही होण्याची शक्यता आहे. मुळकांना मग कामठी मतदार संघाकडे त्यांचा मोर्चा वळवावा लागेल. असे झाले तर तेथे इच्छुक असलेल्या रिपाइंच्या

नागपूर : पश्‍चिममध्ये अशा स्थितीत सुधाकर देशमुखांसारखीच स्थिती मुळकांचीही होण्याची शक्यता आहे. मुळकांना मग कामठी मतदार संघाकडे  त्यांचा मोर्चा वळवावा लागेल. असे झाले तर तेथे इच्छुक असलेल्या रिपाइंच्या सुलेखा कुंभारेंचे काय? लोकसभा निवडणुकीत कुंभारे यांनी काँग्रेसला  पाठिंबा जाहीर केला होता. त्याबदल्यात त्यांना कामठीचे आश्‍वासन दिल्याची चर्चा आहे. मुळक यांच्या पाठीशी मुख्यमंत्री असले तरी, त्यांच्यासाठी  असलेल्या दोन्ही मतदार संघात मेघेंच्या भाजप प्रवेशामुळे पेच निर्माण झाला आहे. उपराजधानीतील दुसरा मतदार संघ हा मध्य नागपूरचा आहे.  मुस्लीम आणि हलबाबहुल असलेल्या या मतदार संघात मेघेंना मानणारा मुस्लीम वर्ग आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या मतदार संघातून  समीर मेघेंच्या नावाची चर्चा होती. येथून यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर विद्यमान आमदार विकास कुंभारेंचे काय? लोकसभा निवडणुकीत  मध्यमधूनही भाजपला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे कुंभारेंची बाजू आजच भक्कम आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना डावलून मेघे पुत्राला उमेदवारी  दिल्यास भाजपमध्येच नाराजीचे सूर उमटू शकतात. याशिवाय कुंभारे हलबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. निवडणुकीच्या तोंडावर या समाजाची  नाराजी पत्करणे कुठल्याही पक्षासाठी धोक्याचे ठरू शकते. सागर मेघे यांना भाजपने विधान परिषदेवर पाठविल्यावर त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश  केला होता. त्यानंतर झालेल्या  पोटनिवडणुकीत भाजपने ही जागा गमावली होती. याची सल आजही भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. याचे पडसादही सागरच्यासंदर्भात निर्णय  घेताना उमटू शकतात.दरम्यान, मेघेंसोबत कोण कोण भाजपमध्ये जाणार, याकडेही आता काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या राजकारणात मेघे सर्मथक आजी-माजी नगरसेवक सक्रिय आहेत. काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले असले  तरी त्यांच्या निष्ठा मेघे कुटुंबीयांवर आहे. त्यात काही मुस्लीम नगरसेवकांचाही समावेश आहे. ही मंडळी भाजपमध्ये जाणार का, याकडेही राजकीय  जाणकारांचे लक्ष लागले आहे.एकूणच विधानसभेच्या तोंडावर झालेला मेघे पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी तोट्याचा असला तरी, भाजपसाठी तो किती फायदेशीर ठरतो, ते  निवडणुकीनंतरच कळणार आहे.  दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघे यांचा भाजप प्रवेश पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  माध्यमातूनच झाला आहे. मेघेंना सन्मानाच्या वागणुकीसोबतच महत्त्वाची पदे देण्याचेही आश्‍वासन भाजपकडून मिळाले असून, त्यात मेघेंना राज्यपालपद तर सागर किंवा  समीरला विधानसभेची उमेदवारी आदींचा समावेश आहे. मेघेंच्या प्रभावामुळे पक्षाकडे कुणबी समाज आकर्षित होऊ शकतो, असे भाजप नेत्यांना  वाटते. (प्रतिनिधी)