बारामती : नोटाबंदीचा निर्णय भाजप सरकारने घेतला. ऐन निवडणुकांच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे सर्वच पक्षांना आर्थिक चणचण भासली. फक्त ‘भाजपाला या निर्णयाच्या यातना झाल्या नाहीत’ याचे उत्तर तुम्हीच शोधा, असा खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पवार यांनी मंगळवारी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टिका केली. त्याचबरोबर सक्षम विरोधी पक्ष नाही. लोकसभेत भाजपाला पूर्ण बहुमत आहे. त्या जोरावर मनात येईल ते निर्णय घेतले जातात, असे सांगून पवार म्हणाले, ५० दिवसानंतर देखील बँकांची परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे सुरुवातीला नोटाबंदीचे समर्थन करणारे नागरिक नाराजीच्या सुरात आहेत. नोटाबंदीचा निर्णयात आता कुठ तरी चूक झाली, गफलत झाली आहे, याचे भान केंद्र सरकारला आल्याचे दिसत आहे. मात्र, ते दाखवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे स्मारकासारखे भावनिक मुद्दे पुढे केले जात आहे. मात्र, केंद्र व राज्यातील सरकारला ‘पुरोगामी’ विचारांची आवश्यकता नाही, अशी खोचक टिकाही त्यांनी केली. नोटाबंदीचा निर्णय चुकलेलाच आहे. आता त्यातून सावरण्यासाठी भावनिकतेला हात घातला जात आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे शस्त्रक्रियेनंतर ‘पेशंट डेड’ अशी आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अनेक पक्षांच्या पाठिंब्यावर झाले होते. आता मात्र ती परिस्थिती नाही. भाजपला लोकसभेत बहुमत आहे. त्यामुळे संख्याबळाच्या ताकदीवर नरेंद्र मोदी निर्णय घेतात. राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे मात्र, त्यांची अडचण होते. ही वस्तूस्थिती आहे. परंतु, प्रभावी विरोधी पक्ष नाही. विरोधकांची शक्ती कमी झाली आहे. काँग्रेसची स्थिती पहिल्या सारखी राहिलेली नाही. प्रादेशिक पक्ष काही राज्यांपुरते मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांची ताकत तोकडी ठरते. परंतु, आगामी काळात विरोधक एकत्रित येतील, असेही भाकित त्यांनी केले.>व्यक्तीगत जीवनात द्वेष नाहीत...नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांना सहकार्य केले. व्यक्तीगत जीवनात आपण कोणाचा द्वेष करत नाही. मोदी सातत्याने पवार यांनी बोटाला धरून राजकारणात आणले, असे सांगतात. परंतु, प्रत्यक्ष निवडणुकांच्या काळात ते आमचे विरोधक म्हणून प्रचारात उतरतात, राजकारण आणि व्यक्तीगत संबंध वेगळे आहेत. असे सांगून पवार म्हणाले,
नोटाबंदीच्या यातना भाजपला का नाही?
By admin | Published: January 18, 2017 1:29 AM