"महाराष्ट्रातच का वाढतायत कोरोना रुग्ण? निवडणुका असलेल्या राज्यात का नाही? तपास करणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 08:26 PM2021-04-11T20:26:50+5:302021-04-11T20:29:36+5:30
कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.
मुंबई - देशात कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक वेग महाराष्ट्रात आहे. देशभरात आढळणाऱ्या एकूण रुग्ण संख्येपैकी जवळपास अर्धे रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात समोर येत आहेत. यातच, निवडणूक असलेल्या राज्यांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ का नाही, याचा तपास करावा, असे आम्ही आपल्या टास्क फोर्सला सांगितले असल्याचे राज्यातील उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री असलम शेख यांनी म्हटले आहे. (Why corona cases are increasing only in Maharashtra and not in states where elections are being held says aslam shaikh)
असलम शेख म्हणाले, 'महाराष्ट्रातच कोरोना रुग्णसंख्या का वाढत आहे. अनेक मंत्री मोठ्या गर्दीत निवडणूक प्रचार करत आहेत. असे असतानाही तेथील कोरोना रुग्ण संख्येत वाढ नाही,' याचा अभ्यास करावा, असे आम्ही कोविड टास्क फोर्सला सांगितले आहे.
राज्यात लशींचा तुटवडा, हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट; भाजपचा ठकरे सरकारवर गंभीर आरोप
कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यांनी इतर राज्यांचा उल्लेख केला नसला तरी, अप्रत्यक्षपणे त्यांनी इतर राज्यांत कोरोना टेस्ट कमी होत आहेत असेच म्हटले होते. देशात रविवारी दीड हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या देशातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. या मुळे चिंता अधिक वाढली आहे. तसेच अनेक राज्यांत नाइट कर्फ्यू आणि लॉकडाउनवर सारखी बंधने घातली जात आहेत.
We've asked COVID19 Task Force to study why cases are increasing only in Maharashtra and not in states where elections are being held. Many ministers are campaigning with mass gatherings there but there is no surge in COVID cases there: Maharashtra Minister Aslam Sheikh pic.twitter.com/7ye7Oj45bT
— ANI (@ANI) April 11, 2021
महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'
राज्यात 120 सेंटर्सपैकी 70 सेंटर्स बंद, कारण लशी संपल्या आहेत - टोपे
महाराष्ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.
"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"
केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.