मुंबई : राज्य शासनााच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दिलेल्या मुदतीत जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षक बदलीसाठी आवश्यक कार्यवाही न झाल्याने शिक्षक बदलीस विलंब होत आहे. यामुळे ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी नाराजी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर १० जून २०१९ रोजी मुंबईत मंत्रालयात होणाºया शिक्षक बदलीसंदर्भातील बैठकीत संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश राज्याच्या सीईओंना (मुख्य कार्यकारी अधिकाºयांना) देण्यात आले आहेत.शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत ८ मार्च २०१९ रोजी शासनाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र पाठविले होते. मात्र त्यास लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थगिती मिळाली. त्यानंतर बदल्यांची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश पुन्हा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बजावण्यात आले.अवघड व सर्वसाधारण क्षेत्रांच्या याद्या घोषित करणे, बदलीपात्र शिक्षकांची शाळानिहाय गावांची यादी घोषित करणे आदी प्रक्रिया पूर्ण करायची होती. मात्र ही कार्यवाही त्यांच्याकडून पूर्ण न झाल्याने ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच ७ जून सायंकाळी ५ पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कार्यवाही पूर्ण न करणाºया जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ८ जूनला तर शिक्षणाधिकाºयांनी १० जूनला ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना यासंबंधित खुलासा सादर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
फक्त ९ जिल्ह्यांतील शिक्षकांना बदल्यांचे अर्ज खुलेराज्यात ६ जून २०१९ च्या अहवालानुसार ९ जिल्ह्यांतील शिक्षक बदल्यांची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या जिल्ह्यातील शिक्षणासाठी बदलीचे अर्ज खुले करून देण्यात आले आहेत. तर तब्बल २० जिल्ह्यांतील शिक्षकी बदल्यांची कार्यवाही पेंडिंग आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे, जळगाव, औरंगाबाद , नागपूर, अमरावती अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.