ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - इतिहास संशोधकांनी मांडलेल्या तथ्याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गो ब्राम्हण प्रतिपालक’ ठरविणे चुकीचे असल्याचे मत मी मांडले होते. माझे हे मत इतके का जिव्हारी लागले ते कळत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकाकारांना उत्तर दिले. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना इतिहासकारांच्या संशोधनाचा दाखला देऊन शिवाजी महाराज गोब्राम्हणप्रतिपालक नव्हते असेही विधान केले होते.
आणखी वाचा
पवारांच्या या विधानावर सोशल मीडियावरुन त्यांच्यावर अत्यंत बोच-या शब्दात टीका करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज सगळया धर्मांचे होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मुस्लीम म्हणून मारलं नाही. शिवाजी महाराज गोब्राम्हणप्रतिपालक नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी नव्हते. रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या आड येणा-यांना त्यांचा विरोध होता. शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी असते तर, त्यांनी अफजल खानाचा वकिल कृष्णाजी कुलकर्णीला सोडले असते. पण त्यांनी कृष्णाजी कुलकर्णीचाही वध केला. रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या आड येणा-यांचा विरोध मोडून काढताना त्यांनी हिंदू, नाती-गोती याची पर्वा केली नाही असे पवार म्हणाले होते.
कर्जमाफीबाबत पूर्ण समाधानी नाही
रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, कोण काय म्हणतो त्याला मी किंमत देत नाही. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांची खदखद त्यातून बाहेर पडत असल्याची टीका पवार यांनी केली.र्जमाफीच्या मुद्यावर आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, पण सरकारने शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य कराव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतमालाच्या हमीभावाबाबत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही पवार यांनी या वेळी केली.
पवार म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते, त्याचे पालन त्यांनी करावे. उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार शेतमालाचे हमीभाव ठरवून द्यावेत अशी शिफारस स्वामीनाथन कमिटीने केलेली आहे.