शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

आर्ट्सला जायचेय, तर गणित कशाला?

By admin | Published: June 20, 2017 2:57 AM

कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नसते

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नसते. त्यामुळे इयत्ता दहावीत हा विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला सोमवारी केली.शाळेत शिक्षण घेताना, विशेष मुलांनाही होत असलेला त्रास व राज्य शिक्षण मंडळाने या संदर्भात उचललेली पावले, या दोन मुद्द्यांवर प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ हरीश शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. गणित व भाषांमध्ये उत्तीर्ण होण्याची क्षमता नसल्याने दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण जास्त आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कला किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणात पदवी घेण्याकरिता गणिताची आवश्यकता नाही. त्यामुळे गणिताच्या अभ्यासाची सक्ती केली नाही, तर विद्यार्थी किमान पदवीधर तरी होतील, असेही न्यायालयाने म्हटले.जुनी पद्धत पुन्हा अंमलात आणागणित किंवा गणिताशिवाय सात विषयांत उत्तीर्ण झाल्यास, पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची परवानगी यापूर्वी राज्य शिक्षण मंडळ देत होते. त्यांनी (शिक्षण मंडळ) हे बंद करण्याचा निर्णय का घेतला, हे कळत नाही. जुनी पद्धत पुन्हा एकदा अंमलात आणण्याचा विचार करा, असे म्हणत न्यायालयाने तज्ज्ञांकडून याबाबत सल्ला घेण्याची सूचनाही राज्य सरकारला केली.