शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

Maharashtra Bandh: "बंद करून पुन्हा आमच्या पोटावर का मारता?"; संतप्त शेतकऱ्यांचा महाविकास आघाडीला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 2:19 PM

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून बाजारपेठेत वारंवार फेऱ्या, बाजार समितीमध्ये सकाळी व्यवहार सुरळीत

जळगाव : महाविकास आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान जळगावात मुख्य बाजारपेठेतील दुकाने आवाहनानंतर बंद करण्यात आली. तर सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे व्यवहार सुरळीत झाले. दुसरीकडे शाळा सुरू आहे, मात्र बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. सकाळी नियमितपणे उघडलेली बाजारपेठ तासाभरातच बंद झाली.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. जळगावात मात्र, सकाळच्या सत्रात बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम नसल्याचे पाहायला मिळाले. शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, यासह बाजारपेठेच्या  भागातील ८० टक्के दुकाने नियमितपणे उघडली. मात्र तासाभरातच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते बाजारपेठेत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करू लागले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील स्वतःहून दुकाने बंद करून घेतली.  दुकाने बंद झाली तरी कार्यकर्ते व पदाधिकारी १५ ते २० मिनिटानंतर वारंवार बाजारपेठेत फिरत होते. त्यामुळे कोणीही दुकाने उघडली नाही.

भाजीपाला खरेदी सुरळीतजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी व विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी केली होती.

घटनेचा निषेध, मात्र बंद करणे चुकीचेमहाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी वर्गाने विरोध दर्शविला. उत्तरप्रदेशात लखीमपूर खेरीमध्ये घडलेली  घटना निषेधार्थ आहे. व्यापारीवर्ग या घटनेचा निषेध करत आहे. पण अशा प्रकारे बंद करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे चुकीचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे आधीच व्यापारीवर्ग संकटात सापडला आहे. आता कुठे हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे एक दिवस जरी बाजारपेठ बंद राहिली तर व्यवहारांची साखळी विस्कळीत होते. त्यामुळे जे व्यापारी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होतील, त्यांनी सहभागी व्हावे, मात्र ज्यांचा बंदमध्ये सहभागी होण्यास नकार असेल, त्यांना नाहक त्रास देऊ नये, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांचाही बंदला विरोधमहाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला शेतकरीवर्गाचा विरोध असल्याचे पाहायला मिळाले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी बंदला विरोध दर्शविणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. खरीप हंगाम हातून गेला आहे. अशा परिस्थितीत शेतात जो भाजीपाला आहे, तो विकून दोन पैसे आमच्या हाती येत आहेत. असा बंद करून पुन्हा आमच्या पोटावर का मारता? असा सवालही काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

'कृउबास'तील धान्य बाजारावर परिणामशेतकरीवर्गाची गैरसोय होऊ नये, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी भाजीपाला खरेदी-विक्री सुरू ठेवण्यात आली. तसे बंद संदर्भात बाजार समितीला कोणतेही आदेश नव्हते. मात्र, दिवसभर सुरू राहणारा धान्य बाजार व तेथील संपूर्ण व्यवहारावर बंदचा परिणाम जाणवला. धान्य बाजारात कोणीही माल आणत नसल्याने या ठिकाणी बंद सारखेच चित्र होते. 

विद्यार्थ्यांची प्रतीक्षासोमवारच्या बंद संदर्भात शिक्षण विभागाचा कोणताही आदेश नव्हता. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षक हजर होते, मात्र बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास धोका पत्करण्यापेक्षा पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रतीक्षा असल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhMahavikas Aghadiमहाविकास आघाडीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार