पुणे :आगामी विधानसभेत अनेक नेत्यांच्या महत्वकांक्षा दिसून येत आहेत. महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री होण्याची तयारी दाखवली असून 'पक्षाने मुख्यमंत्रीपद दिले तर सोडतोय का' अशा शब्दांत आपली इच्छा व्यक्त केली.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष अभिजीत बारभाई उपस्थित होते.पुढे ते म्हणाले की, माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. पक्ष देईल ते काम करायला आवडेल. पुण्यातील कसबा काय तर गडचिरोलीत जाऊन पण लढायची पण तयारी आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निभावेन.भाजपमध्ये होणा?्या पक्ष प्रवेशांबद्दल ते म्हणाले की, आम्ही कुठलीही व्यक्ती पक्षात घेताना तावून - सुलाखून घेत आहोत. कोणत्याही व्यक्तीचा प्रवेश घेत नाही.मुळात नवीन आलेले चार चेहरे पक्ष बदलणार नाहीत.सध्या महाराष्ट्रात 43 व्यक्तींचे मंत्रिमंडळ आहे. त्यापैकी 13 व्यक्ती शिवसेनेच्या आहेत. फक्त राधाकृष्ण विखे पाटील सोडले तर कोणीही बाहेरून घेतलेले नाहीत. उर्वरित सगळे मूळ भाजप संघटनेत काम केलेले आहेत. विखे यांनाही घेताना त्यांच्या कुटुंबाचे तीन पिढ्यांचे काम लक्षात घेतले आहे.प्रशासन चालवताना अशा अनुभवी लोकांची मदत लागतेच.
मुख्यमंत्रीपद मिळाले तर सोडतोय का : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 4:37 PM