पुणे : माझा मोबाईल क्रमांक राज्यसभेच्या वेबसाईटवर आहेत. तो कोणाकडेही असू शकतो. मात्र, पोलिसांना वाटत असेल की आतंकवाद्यांना मिळालेलो आहे तर ते मला अटक का करत नाही असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात केला.
पुण्यात एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे मिळालेल्या चिठ्ठीत दिग्विजय सिंह यांचा क्रमांक आढळला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप केला. पुढे ते म्हणाले की, एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात. ही कोणती लढाई आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर उमेदवारीला यावेळी लक्ष केले.ती व्यक्ती नथुराम गोडसेला देशभक्त म्हणते. तुम्ही त्यांना दिलसे माफ नाही करत म्हणतात. पण 56 इंच छातीत किती मोठं हृदय आहे हा प्रश्न आहे. यापुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे जे लोक खुलेपणाने समाजात गोंधळ माजवतात त्यांना ते सोशल मीडियावर फॉलो करतात.गोवा विधानसभेतील घडामोडींवर ते म्हणाले की, भाजपने नोटबंदीत इतका पैसा कमावला आहे, ज्या पद्धतीने बाजारात सामान मिळते त्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना खरेदी केले जात आहे.त्यांनी सांगितले की, भाजपने उत्तर प्रदेशमध्ये 300 जागा मिळतील असे सांगितले होते तिथेही त्यांचा अंदाज बरोबर आला. 2019च्या लोकसभेबाबतही 300 जागांचा दावा केला होता जो बरोबर ठरला होता. अतिशय आश्चर्यकारक असे त्यांचे अनुमान आहे. जिथे सगळ्यात मोठी लोकशाही आहे, अशा देशात त्यांनी इतक्या बारकाईने भविष्यवाणी केली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे-इच्छेने किंवा चुकून बजेटमध्ये तफावत,-बेरोजगाराची समस्या असताना त्याचाही अर्थसंकल्पात उल्लेख नाही.-नरेंद्र मोठी स्वप्नं दाखवतात. 2014साली नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, बेरोजगारी-5 ट्रीलियन अर्थव्यवस्था करायची असताना विकासदर वाढवणे गरजेचे आहे मात्र स्थिती त्या उलट आहे. त्यामुळे 2024पर्यन्त देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रीलियन होईल असे वाटत नाही मात्र मोदींना स्वप्न विकता येतात.-पुलवामा हल्ल्यात साडेतीन क्विंटल विस्फोटक होते हे सरकारला कसे माहितीत? जर पूर्वसूचना होती तर सीआरपीएफच्या जवानांना पाठवून जोखीम का उचलली ? तरीही सरकारने कोणालाही जबाबदार धरले नाही.-श्रीलंकेत 44 जवान मारले गेले तेव्हा तिथे अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. भारतात मात्र गुप्तचर यंत्रणांचे अपयश असताना कोणालाही जबाबदार धरले जात नाही. जेव्हा हे आम्ही विचारतो तेव्हा आम्हाला देशद्रोही ठरवले जाते.