शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कर नाही त्याला डर कशाला?

By admin | Published: July 21, 2016 1:59 AM

संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात दिंडेकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली.

पिंपरी : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात दिंडेकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. सत्कार सोहळ्यात काही नगरसेवकांनी मूर्ती पळविली, असा गौप्यस्फोट महापौर शकुंतला धराडे यांनी केला होता. याबाबतच्या प्रश्नाचे पडसाद आजच्या सर्वसाधारण सभेत उमटले. मूर्तिचोर नगरसेवकांची नावे जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेने करताच महापौर संतप्त झाल्या. ‘मी कोणतेही चुकीचे काम केले नाही. कर नाही त्याला डर कशाला?’ असे म्हणत सभागृहात गरजल्या. कोणत्याही चौकशीला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.महापालिका सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी शिवसनेनेचे नगरसेवक विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती चोरी प्रकरणाचा निषेध करण्याच्या तयारीत होते. ‘महापौर मूर्तिचोर नगरसेवकांची नावे जाहीर करा’ असे लिहिलेले शर्ट परिधान करून शिवसेना नगरसेवक सभागृहात आले होते. त्यात गटनेत्या उबाळे यांच्यासह अश्विनी चिंचवडे, नीलेश बारणे, संगीता भोंडवे, शारदा बाबर, धनंजय आल्हाट, संपत पवार, संगीता पवार यांनी मूर्तिचोरीचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. सभेचे कामकाज सुरू होताच सुजाता पालांडे यांनी तहकुबीचा ठराव मांडला. त्या वेळी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी बोलण्याची परवानगी मागितली. महापौरांनी त्यांना बोलण्याची संधी दिली. उबाळे म्हणाल्या, ‘‘पालखी सोहळ्यातील दिंडेकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. या विषयी महापौरांनी मूर्तीची चोरी नगरसेवकांनी केली, असे माध्यमांना सांगितले. ’’ महापौरांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महापौर तहकुबीचा निर्णय द्या, अशी मागणी सत्तारूढ पक्षाने केली. मात्र, तहकुबीची सूचना मान्य न करत, मी पक्षाची नाही, शहराची महापौर आहे. कर नाही, त्याला डर कशाला, असे संतापून महापौरांनी मूर्ती चोरीच्या वक्तव्याचा खुलासा केला. (प्रतिनिधी)>महापौर म्हणाल्या, ‘‘पालखी सोहळ्यातील दिंडेकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. ६५० मूर्ती खरेदीचा मूळ विषय होता. पालखीसोहळ्यात दिंड्यांची वाढ झाली आहे. म्हणून मी ८५० मूर्तींची खरेदी करावी, अशी मागणी प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांच्याकडे केली होती. दिंडेकऱ्यांना मूर्ती भेट द्यावी, असा महापौर म्हणून माझा प्रयत्न होता. मूर्ती खरेदीत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.’’कोणत्याही चौकशीला तयारसर्वसाधारण सभेनंतर तिसऱ्या मजल्यावरील दालनात महापौर आल्यानंतर त्या भावुक झाल्या. महापौर म्हणाल्या, ‘‘चांगल्या भावनेने मी विषयाचा आदेश दिला होता. याबाबत मलाच दोषी धरण्यात येत आहे. याबाबत काय चौकशी करायची ती करा. मी फक्त आदेश दिला होता. कोणत्याही चौकशीला तयारी आहे. कोणाला न्यायालयात जायचे त्यांनी जावे. खरेदी ज्यांनी केली, ते दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई करा.’’ या विषयीची भावना व्यक्त करताना अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ‘‘पालखीसोहळ्यातील वारकऱ्यांना फक्त या वर्षीच मूर्ती भेट दिल्या का, दर वर्षी दिल्या जातात. मग आरोप याच वर्षी का, मी मागासवर्गीय असल्याने काही लोक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही महापौर म्हणाल्या.