मुंबई : दरवर्षी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. पण तो चिंतीत मनाने का साजरा करतो? एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची. या टापांचा आवाज खणखणीत होता, तर मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा, असा प्रश्न करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठीचा आवाज अजिबात केविलवाणा नसल्याचे सांगितले. मराठी ही जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळात ‘इये मराठीचिये नगरी’ या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मराठीचा आग्रह केवळ एका दिवसासाठी नको. ‘बये दार उघड’ असे सांगणारी, प्रत्येक संकटात धावून येणारी, मुगल आणि इंग्रजांना पुरुन उरलेली भाषा आपली मराठीच आहे. त्यामुळे मराठी टिकेल कीनाही याची चिंता नको, असे मुख्यमंत्री म्हणाले.मराठी भाषेविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, प्रत्येक प्रांताला संस्कृती आणि परंपरा असते. त्याचप्रकारे वादाची परंपराही असते. महाराष्ट्राने फक्त वादाची परंपरा कायम ठेवली आहे, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी गोंधळी विरोधकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. गोंधळी बाहेर आहेत त्यामुळे मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम सुरळीत पार पडत आहे.खाली काही गोंधळी भेटले होते. मात्र ते तिथेच भेटले म्हणून बरे झाले, सभागृहात असते तर कार्यक्रम सुरळीत झाला नसता. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री म्हणाले की, फडणवीसजी मला कुणाचाही अपमान करायचा नाही. पण काल विधानपरिषदेत मराठी भाषा सक्तीचे विधेयक मांडल्यानंतर ज्याप्रकारची भाषणे झाली, तशी मी आतापर्यंत विधीमंडळात तरी ऐकली नव्हती. अशी अभ्यासपूर्ण आणि शांतपणे भाषणे झाली तर चांगले होईल, असे सांगत विधीमंडळात गोंधळ घालणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.अशी एकही शाळा का नाही?या कार्यक्रमाला गिरगाव येथील सेंट टेरेसा शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपल्या देशात सेंट नावावरुन अनेक शाळा आहेत. मात्र संत तुकाराम, संत नामदेव अशी एकही शाळा नाही.मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर ऐकतो मराठी, बोलतो मराठी... यासोबतच पाहतो मराठी देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.आज आपण मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार जरी झालो पण पुढल्या ५० वर्षांनी आपले नाव घेतले जाईल असे काहीतरी काम केले पाहिजे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केलीविधिमंडळात मराठी दिनाचा जल्लोषआमदारांची घोषणाबाजी, आरोप आणि प्रत्यारो या राजकीय वातावरणाला सरावलेली विधीमंडळाची वास्तु गुरूवारी सांस्कृतिक सूराने न्हावुन निघाली. मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडी, बारा बलुतेदारांचे चित्रमय प्रदर्शनात नेते मंडळी उत्साहात सहभागी झाली.या सांस्कृतिक दिंडीनंतर विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ह्यइये मराठीचिये नगरीह्ण हा कार्यक्रम झाला. याची सुरूवात मराठी भाषा परिषदेच्या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या व्याख्यानाने झाली. ह्यमराठी भाषा काल, आज आणि उद्याह्ण या विषयावर बोलताना त्यांनी मराठीची सांस्कृतिक बलस्थाने उलगडली. पारंपरिक चौकटीबाहेरचे अभ्यासक्रम सुरू व्हायला हवीत. सध्या मराठी भाषा प्रशिक्षकांची गरज आहे. प्रशिक्षक तयार करणाºया अभ्यासक्रम सुरू करायला हवेत, अशी सूचनाही त्यांनी केला. यानंतर ‘इये मराठीचिये नगरी’ हा संगीतमय कार्यक्रम झाला. गायक नचिकेत देसाई, विद्या करलगीकर, डॉ. राम पंडित यांनी गाणी सादर केली.
मराठी दिनी केविलवाणे स्वर कशासाठी?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 4:35 AM