प्रकाश आंबेडकरांना का नको राष्ट्रवादी; खरंं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 05:53 PM2019-08-28T17:53:31+5:302019-08-28T18:19:05+5:30
विधानसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे.
अकोला - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळेकाँग्रेसला ९ ठिकाणी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावे अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. मात्र राष्ट्रवादी सोबत असेल तर आपण महाआघाडीत येणार नसल्याचा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी हे भाजपसोबत आहे. तसेच राष्ट्रवादी ही भाजपला कधीही जाऊन मिळू शकते. त्यामुळे आमचा त्यांना विरोध असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. अकोल्यात पत्रकारांशी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र जरी काँग्रेससोबत जाण्याचे ठरले, तर काँग्रेसला राष्ट्रवादीला सोडावे लागेल. राष्ट्रवादी महाआघाडीत असेल, तर आम्ही काँग्रेससोबत येणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहेत. राष्ट्रवादी भाजपसोबत आहेत. वेळ पडल्यास ते कधीही भाजपबरोबर जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत चर्चा करताना राष्ट्रवादीला ग्रहीत धरले नसल्याचे सुद्धा आंबडेकर म्हणाले.आम्हाला राष्ट्रवादी नको ही बाब अगदी स्पष्ट असून, आता निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. आमची जी काही भूमिका आहे ३१ ऑगस्ट रोजी स्पष्ट करू असेही आंबेडकर म्हणाले.
तसेच एमआयएम सोबत आमची युती होणार असून आमच्यात कधीच कोणतेही वाद नसल्याचे आंबेडकर म्हणाले. त्याच बरोबर एमआयचे प्रमुख असुद्दिन ओवेसी हे त्यांच्या पक्षातील निर्णय घेतात व त्यांच्या सोबत आमचे संबध खूप चांगले असून युती करण्याचे आमचं ठरलं असल्याचा दावा आंबेडकर यांनी यावेळी केला.