शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

सणासाठी डीजे कशाला हवा?

By admin | Published: March 23, 2016 3:04 AM

कोणत्याही धार्मिक स्थळावर किंवा कोणताही धार्मिक, सामाजिक सण साजरा करण्यासाठी लाउडस्पीकरची आवश्यकता नाही, असे आपले वैयक्तिक मत आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने होळी

मुंबई : कोणत्याही धार्मिक स्थळावर किंवा कोणताही धार्मिक, सामाजिक सण साजरा करण्यासाठी लाउडस्पीकरची आवश्यकता नाही, असे आपले वैयक्तिक मत आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने होळी, रंगपंचमीसाठी डीजे हवाच कशाला? अशी विचारणा मलबार हिल येथील एका उच्चभ्रू सोसायटीला केली.मलबार हिल येथील कासा मिठा या सोसायटीने होळी व रंगपंचमीसाठी डीजे लावण्याची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.या सोसायटीत केंद्रीय महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत, तसेच आजूबाजूच्या सोसायटींमध्येही उच्चभ्रू राहात आहेत. लोकांना सणाचा आनंद संगीत आणि नृत्याच्या सहाय्याने साजरा करायचा आहे. हा परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आलेला नाही. त्याशिवाय साउंड बॅरियर्सच्या साहाय्याने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)‘रंगपंचमी, होळी यासारखे सण साजरे करण्यासाठी डीजे हवाच कशाला? मुळातच कोणत्याही धार्मिक स्थळावर किंवा कोणताही धार्मिक व सामाजिक उत्सव साजरा करण्यासाठी लाउडस्पीकरची आवश्यकताच काय? हे सर्व बंद करायला हवे, हे आमचे वैयक्तिक मत आहे,’ असे म्हणत खंडपीठाने मलबार हिल पोलीस स्टेशनला संबंधित जागेची पाहणी करून बुधवारी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.