शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

लोकसभा निकालानंतर लाडकी बहीण योजना का आणली?; CM एकनाथ शिंदेंचं विरोधकांना थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:51 PM

निवडणुकीनंतरही ही योजना सुरू राहील. काँग्रेसचे लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले. गरिबांना पैसे मिळाले तर विरोधकांच्या पोटात का दुखतंय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

मुंबई - आमचं सरकार गरिबांचे, सर्वसामान्यांचे आहे. मग आमच्यासाठी काय करणार की नाही असं सर्वसामान्य विचारतात. लाडकी बहीण योजना एका दिवसांत आली नाही, लोकसभा निकालानंतर आम्ही ठरवले आणि अंमलात आणले असं होत नाही. त्यासाठी एक दीड वर्षापासून त्याची तयारी सुरू होती. गरिबी आम्हीही पाहिली, ग्रामीण भागात असो वा शहरी भागात गरिब महिला घर कसं चालवतात हे आम्हाला माहिती आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज दीड हजार महिन्याला आणि वर्षाला १८ हजार मिळतात. घरात २ बहिणी असल्या तर ३ हजार महिन्याला आणि वर्षाला ३६ हजार मिळतात. घरातील मुलींना उच्च शिक्षणासाठी सरकार खर्च करतंय. कर्नाटकात काँग्रेसनं ही योजना आणली आणि निवडणुकीत जिंकल्यानंतर आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून बंद केली. केंद्र सरकारने पैसे द्यायला हवेत बोलले. हिमाचल प्रदेशात काँग्रेसनं आश्वासन दिले, त्यानंतर बोलले प्रिटिंग मिस्टेक होती बोलले. खटाखट खटाखट पैसे देणार होते ते कुठे गेले? असा सवाल त्यांनी विचारला. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात शिंदेंची मुलाखत घेण्यात आली.

तसेच निवडणूक येईल जाईल, सरकार येईल जाईल पण लोकांसोबत आमचं नाते निवडणुकीपुरतं नाही. पूर्ण वर्षाचं निधी तरतूद बजेटमध्ये करण्यात आली. निवडणुकीनंतरही ही योजना सुरू राहील. काँग्रेसचे लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले. गरिबांना पैसे मिळाले तर विरोधकांच्या पोटात का दुखतंय, महिला अर्थव्यवस्थेला चालना देतायेत. त्यांना मिळणारे पैसे बाजारात येतात. मोदींच्या १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल  असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंसोबत समोरासमोर चर्चा करायला तयार...

दरम्यान, जर उद्धव ठाकरे माझ्यासमोर येणार असतील तर मीदेखील तयार आहे. मी माझे काम सांगेन, पण ते काय सांगणार..? घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते, मास्क लावा हे सांगितले. आमचं सरकार आल्यानंतर सर्वांवरील निर्बंध हटवले, सणउत्सव सुरू केले. अनेक प्रकल्प रखडले होते ते सुरू केले. मला काय मिळणार यापेक्षा जनतेला काय मिळणार हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.  

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४